News Flash

घरचा विरोध पत्करून जॉर्डनची टेबल टेनिसमध्ये कारकीर्द

गेल्या पाच वर्षांमध्ये त्याच्या नावावर युरोपियन स्पर्धामधील विजेतेपदांसह अनेक विजेतेपदे आहेत.

जॉर्डन

इंग्लंडच्या दक्षिणेस असलेल्या जेर्सी या देशात गोल्फ, क्रिकेट, रग्बी व फुटबॉल या खेळाचे वेड आहे. या देशात या खेळांकडेच साऱ्यांचा कल असतो. पण त्याला आवड होती ती टेबल टेनिस खेळाची. घरच्यांचा खेळामध्ये कारकीर्द घडवायला विरोध नव्हता, पण टेबल टेनिस खेळायला मात्र नक्कीच होता. टेबल टेनिस खेळून हाती काही जास्त लागणार नाही, असे त्यांना वाटत होते. पण जॉर्डन विक्सला मात्र स्वत:च्या निवडीवर मात्र विश्वास होता. त्याने टेबल टेनिसमध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय घेतला आणि तो युरोपियन लीगमधील अनपेक्षित कामगिरी करणारा खेळाडू म्हणून लोकप्रिय झाला आहे.

जॉर्डनने आठव्या वर्षी हातात रॅकेट घेतली. स्थूल शरीरामुळे त्याला सुरुवातीली अव्वल दर्जाची कामगिरी करण्यासाठी खूप झगडावे लागले. अनेक महिने तो अव्वल दर्जाच्या यशापासून दूर होता. तेव्हाही त्याने हा खेळ सोडावा असा घरच्यांचा आग्रह सुरू होता. मात्र जॉर्डन हा आपल्या खेळाबाबत ठाम होता. त्याने अव्वल यश मिळविण्यासाठी कठोर मेहनत व एकाग्रतेवर लक्ष केंद्रित केले. दररोज सहा ते सात तास फक्त स्पर्धात्मक सराव तो करीत होता. तहानभूक विसरून फक्त टेबल टेनिस हेच त्याचे जीवन झाले होते. अखेर दीड वर्षांनी त्याला राष्ट्रीय स्तरावर पहिले विजेतेपद मिळाले. मग त्याने मागे पाहिलेच नाही. गेल्या पाच वर्षांमध्ये त्याच्या नावावर युरोपियन स्पर्धामधील विजेतेपदांसह अनेक विजेतेपदे आहेत.

जॉर्डन हा केवळ पंधरा वर्षांचा असला तरी त्याला सुदृढ शरीरयष्टी लाभली आहे. त्यामुळे त्याने रग्बी किंवा फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवावी, अशी त्याच्या आईवडिलांची इच्छा होती. मात्र त्याला लहानपणापासून टेबल टेनिसचे आकर्षण होते. त्याच्या देशात टेबल टेनिसकरिता जागतिक दर्जाच्या सुविधा नसल्या तरी आपण या खेळातच नाव कमवायचा निर्धार त्याने व्यक्त केला. सुरुवातीला त्याच्या घरच्यांकडून त्याला अपेक्षेइतके प्रोत्साहन मिळाले नाही. मात्र अवघ्या तीन वर्षांमध्ये त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतलेली झेप पाहून त्याला आता घरच्यांकडूनही प्रोत्साहन मिळत आहे.

आपल्या या खडतर प्रवासाबाबत जॉर्डन म्हणाला की, ‘‘सुरुवातीची दीड वर्षे माझ्यासाठी खूपच कष्टप्रद होती. मला फक्त या खेळातील विजेतेपदाचा चषक दिसत होता. एक दिवस मी राष्ट्रीय विजेता होईन अशी मला खात्री होती. सुरुवातीचे हे दिवस आठवले की अंगावर काटा येतो. आत मात्र घरचे सर्व जण मला भरपूर साहाय्य करीत असतात. माझी खूपच काळजी घेतात. माझ्यासाठी पोषक आहार, औषधपाणी याबाबत ते खूपच जागरूक असतात.’’

जॉर्डनला येथे मोटूराम असे नाव पडले आहे. त्याबाबत विचारले असता तो म्हणाला की, ‘‘मी ढेरपोटय़ा असलो तरी या खेळात मी नाव कमावत असल्याचा मला आनंद आहे. येथील चाहत्यांचा मी खूप आभारी आहे. चाहत्यांचे प्रोत्साहन हे माझ्या यशाचे गमक आहे. त्याच्या जोरावर एक दिवस मी वरिष्ठ गटात जागतिक क्रमवारीत पहिल्या पन्नास खेळाडूंमध्ये स्थान मिळवेन अशी मला खात्री आहे.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2015 1:31 am

Web Title: jordan table tennis career
Next Stories
1 श्रीलंकेला आघाडीची संधी
2 सीटीएल संयोजकांना संघ वाढवण्याची इच्छा
3 भारताचे एक रौप्य व दोन कांस्यपदक पक्के
Just Now!
X