22 August 2019

News Flash

आयपीएलमुळेच मला कसोटी संघात जागा मिळाली – जोस बटलर

प्रदीर्घ कालावधीनंतर बटलरचं कसोटी संघात पुनरागमन

जोस बटलरची पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकेत आश्वासक खेळी

पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत सोडवतं इंग्लंडने घरच्या मैदानावर आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलरने कसोटी संघात पुनरागमन केलं. आयपीएलच्या अकराव्या हंगामात राजस्थान रॉयल्सविरुद्ध केलेल्या बहारदार कामगिरीमुळे आपल्याला कसोटी संघात जागा मिळाल्याचं जोस बटलरने कबुल केलं आहे. “राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळलेले दोन आठवडे मला प्रचंड अनुभव देऊन गेले. इंग्लंडच्या संघाकडून खेळतानाही मला त्याचा फायदा झाला.” बटलरने आपल्या पुनरागमनाचं श्रेय आयपीएल सामन्यांना दिलं.

“भारतामध्ये हजारो प्रेक्षकांसमोर अटीतटीच्या सामन्यामध्ये खेळणं हे आव्हानात्मक असतं. अशा परिस्थितीत खेळल्यामुळे मला आत्मविश्वास मिळाला. याच जोरावर इंग्लंडकडून मला चांगली कामगिरी करता आली याचा मला आनंद आहे. आयपीएलच्या अकराव्या हंगामातही जोस बटलरच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला होता. यानंतर पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यासाठी बटलर मायदेशी परतला होता.

First Published on June 5, 2018 3:42 pm

Web Title: jos buttler credits ipl for success of test comeback
टॅग IPL 2018