ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडच्या विजयात महत्वाची भूमिका बजावणारा जोस बटलर अखेरच्या टी-२० सामन्यात खेळू शकणार नाहीये. आपल्या परिवाराला भेटण्यासाठी बटलरने Bio Security Bubble मोडल्यामुळे तो अखेरचा सामना खेळणार नाहीये. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने याबद्दल माहिती दिली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेदरम्यान तो पुन्हा इंग्लंड संघासाठी उपलब्ध असेल असंही इंग्लंड बोर्डाने स्पष्ट केलं आहे.

अवश्य वाचा – Video : इंग्लंडच्या खेळाडूंचं हास्यास्पद वर्तन, चेंडू बॅटला लागूनही LBW साठी घेतला DRS

ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात बटलरने इंग्लंडकडून महत्वपूर्ण खेळी केली. १५८ धावांचा पाठलाग करताना बटलरने ५४ चेंडूत नाबाद ७७ धावा केल्या. बटलरच्या या खेळामुळे इंग्लंडने ६ गडी राखून सामना जिंकत मालिकेत २-० ने विजयी आघाडी घेतली. मात्र शुक्रवारपासून सुरु होणाऱ्या वन-डे मालिकेपर्यंत तो इंग्लंड संघात परतणं अपेक्षित आहे. इंग्लंडने ही मालिका ३-० ने जिंकल्यास ते टी-२० क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकू शकताक. त्यामुळे अखेरच्या सामन्यात इंग्लंडचा संघ कसा खेळ करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.