श्रीलंका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला अजून एक धक्का बसला असून त्यांचा जलदगती गोलंदाज जोश हॅझलवूडने पाठीच्या दुखापतीमुळे माघार घेतली आहे. हॅझलवूडला गतवर्षी ज्या भागातील दुखापतीने त्रस्त केले होते, त्याच दुखापतीने पुन्हा उचल खाल्ली आहे. त्यामुळेच त्याने दौऱ्यासाठी उपलब्ध नसल्याचे कळवले आहे. त्यामुळे हेझलवूडच्या जागी झाये रिचर्डसनची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे.