आप की अदालत या कार्यक्रमाद्वारे लाखो प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेल्या पत्रकार रजत शर्मा यांची सेकंड इनिंग आता क्रिकेटच्या मैदानात सुरु होणार आहे. रजत शर्मा यांची दिल्ली क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ५४.४० % मतं घेत रजत शर्मा यांनी विजय मिळवला आहे. तर राकेश कुमार बन्सल यांची उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे. बन्सल यांना ४८.८७ % मतं पडली. या निवडीनंतर रजत शर्मा यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सर्वांचे आभार मानले आहेत.

१६ मे रोजी रजत शर्मा यांनी आपण दिल्ली क्रिकेट असोसिएशनची निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. पद्मभुषण पुरस्कारप्राप्त रजत शर्मा हे सध्या हिंदी वृत्तवाहिनी India TV चे मुख्य संपादक आहेत.