08 March 2021

News Flash

निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी

खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयातील सहा माजी न्यायमूर्तीची नावे ठेवण्यात आली होती.

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) लवाद अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायालयाने ‘बीसीसीआय’वर नेमलेले ते पहिले लवाद अधिकारी आहेत.

न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि ए. एम. सप्रे यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले आहे की, ‘‘दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने निवृत्त न्यायमूर्ती डी. के. जैन यांची ‘बीसीसीआय’चे लवाद अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.’’

खंडपीठासमोर सर्वोच्च न्यायालयातील सहा माजी न्यायमूर्तीची नावे ठेवण्यात आली होती. यापैकी जैन यांना प्राधान्य देण्यात आले. खंडपीठाने जैन यांच्या नावाविषयी विचारले असता सर्व वकिलांनी अनुकूलता दर्शवली.

राज्य क्रिकेट संघटनांमधील खेळाडूंचे प्रश्न आणि आर्थिक समस्या सोडवण्याची जबाबदारी लवाद अधिकाऱ्यांवर असेल, असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ९ ऑगस्ट २०१८च्या निकालात लोकपालांच्या नियुक्तीची शिफारस केली होती. काही दिवसांपूर्वी हार्दिक पंडय़ा व लोकेश राहुल वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना त्यांच्या निलंबनासंदर्भात निर्णय घेण्यासाठी लोकपालांची गरज तीव्रतेने भासली होती.

प्रशासकीय समितीमधील मतभेदांबाबत सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय आणि सदस्य डायना एडल्जी यांच्यातील मतभेदांसदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी प्रकट केली. तुमच्यामधील वाद लोकांसमोर जाता कामा नये, अशा सूचना त्यांना केल्या आहेत. प्रशासकीय समितीमध्ये आणखी तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे न्यायमूर्ती एस. ए. बोबडे आणि ए. एम. सप्रे यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने म्हटले आहे. प्रशासकीय समितीमध्ये आधी चार सदस्यांचा समावेश होता. मात्र इतिहासतज्ज्ञ रामचंद्र गुहा आणि बँकिंगतज्ज्ञ विक्रम लिमये यांना राजीनामा दिल्यामुळे फक्त दोनच सदस्य आता शिल्लक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 22, 2019 12:36 am

Web Title: justice dk jain appointed bcci ombudsman
Next Stories
1 भारताची भूमिका धोक्याची ठरू शकेल!
2 IND vs AUS : मुंबईकर फिरकीपटू देणार ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धडे
3 मुंबईकर श्रेयसचा धमाका! T20मध्ये केला धोनी, विराटलाही न जमलेला विक्रम
Just Now!
X