आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगप्रकरणाची चौकशी करणाऱया न्या. मुदगल समितीने आपला अंतरिम अहवाल शुक्रवारी बंद लिफाफ्यात सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला. येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाकडून हा लिफाफा उघडण्यात येईल. त्यानंतरच समितीने आपल्या अहवालात काय म्हटले आहे, याचा उलगडा होणार आहे.
समितीचे वकील राजू रामचंद्रन यांनी हा बंद लिफाफा न्यायालयाकडे सुपूर्द केला. येत्या सोमवारी तो या प्रकरणातील सर्व पक्षकारांना देण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. समितीने एन. श्रीनिवासन आणि गुरुनाथ मयप्पन यांची चौकशी केल्याची चर्चा होती. त्या पार्श्वभूमीवर या अहवालात समितीने काय म्हटले आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.