ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा या भारताच्या महिला दुहेरी जोडीला जर्मनी येथे सुरू असलेल्या बिटबर्गर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पराभवाचा धक्का सहन करावा लागला. राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या या जोडीला मलेशियाच्या चौथ्या मानांकित ह्य़ू एर्न एनजी-ह्य़ू लिन एनजी या जोडीने १५-२१, १६-२१ असे हरवले. पुरुषांमध्ये, आनंद पवारला पराभूत व्हावे लागल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात
आले.
महिला एकेरीत, पी. सी. तुलसी हिला पराभवाचा सामना करावा लागला. तिला फ्रान्सच्या सहाव्या मानांकित ससिना विघ्नेस वरान हिच्याकडून २१-१८, १४-२१, १४-२१ असा पराभव पत्करावा लागला. आनंद पवार याला स्कॉट इव्हान्सकडून २१-१६, १७-२१, ६-२१ असे पराभूत व्हावे लागले.
अश्विनी पोनप्पा आणि तरुण कोना यांना मिश्र दुहेरीत स्वीडनच्या निको रुपोनेन-अमांडा हॉगस्ट्रॉम यांच्याकडून २१-१५, १९-२१, १७-२१ असे पराभूत व्हावे
लागले. ज्वाला-अश्विनी ही जोडी वर्षभराच्या कालावधीनंतर एकत्र आली होती. मात्र त्यांना
आपल्या खेळाची छाप पाडता
आली नाही.