19 October 2019

News Flash

‘के एल राहुलला ही गोष्ट सर्वात प्रिय’

पहिल्या टी२० सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला लोकेश राहुल याच्याबद्दल एक रोचक गोष्ट समजली आहे.

लोकेश राहुल (संग्रहित छायाचित्र)

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यातील पहिले २ टी२० सामने झाले असून त्यातील मालिका १-१ अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील अंतिम सामन्यात मालिकेचा विजेट निश्चित होणार आहे. पण या दरम्यान, पहिल्या सामन्यात भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला लोकेश राहुल याच्याबद्दल एक रोचक गोष्ट समजली आहे. राहुलचे बालपणीचे प्रशिक्षक जयराज मुथू यांनी ही गोष्ट उघड केली आहे.

जयराज हे एका मुलाखतीत बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले की राहुलला आपल्या हृदयाजवळ असेलली सर्वात जवळची गोष्ट म्हणजे फलंदाजी. राहुलला फलंदाजी प्रचंड आवडते. इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याला फलंदाजी प्रिय आहे. तो सराव सत्रात दिवसाला ६-६ तास फलंदाजीचा सराव करतो.

राहुल केवळ नेटमध्येच सराव करतो असे नाही. तो ज्यावेळी घरी असतो, तेव्हा त्याच्या वडिलांना तो चेंडू फेकायला लावतो आणि तो घरी फलंदाजीचा सराव करतो. तो आपल्या फलंदाजीशी अत्यंत प्रामाणिक आहे. कारण फलंदाजी हेच त्याच्या साठी सर्वस्व आहे, असेही मुथू यांनी सांगितले.

First Published on July 7, 2018 8:33 pm

Web Title: k l rahul loves batting than anything else says his coach muthu
टॅग Coach,Love