04 June 2020

News Flash

श्री समर्थ, रॅडिकल, होतकरू अजिंक्य

पुरुष प्रथम श्रेणी मालिकावीर म्हणून काळूराम म्हात्रेची निवड झाली. निखिल म्हात्रे उत्कृष्ट पकडपटू ठरला

प्रथम श्रेणीतील विजेता श्री समर्थ कबड्डी संघ.

रॅडिकल सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे आयोजित सुवर्णचषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री समर्थ (कालवार), रॅडिकल (गावदेवी) आणि होतकरू (ठाणे) या संघांनी विजेतेपदावर नाव कोरले.
पुरुष प्रथम श्रेणीत कालवारच्या श्री समर्थ संघाने ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संघावर २५-२० असा विजय मिळवला. काळूराम म्हात्रे, सागर पाटील, निखिल म्हात्रे यांनी दिमाखदार खेळ केला. पुरुष द्वितीय श्रेणीत रॅडिकल क्रीडा मंडळाने चिंचपाडावर (कल्याण) १२-११ असा निसटता विजय मिळवला.
महिला गटात होतकरू संघाने प्रेरणा संघाला २३-२० असे नमवले. अद्वैता मांगले, सायली परुळेकर आणि चैताली बोऱ्हाडे या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.
पुरुष प्रथम श्रेणी मालिकावीर म्हणून काळूराम म्हात्रेची निवड झाली. निखिल म्हात्रे उत्कृष्ट पकडपटू ठरला. द्वितीय श्रेणीत अमोल ठाकूर मालिकावीर तर गणेश ठाकूर सवरेत्कृष्ट पकडपटू ठरला. महिलांमध्ये चंद्रिका जोशी मालिकावीर तर हर्षला मोरे सवरेत्कृष्ट पकडपटू पुरस्काराच्या मानकरी ठरल्या.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2016 5:25 am

Web Title: kabaddi tournament organized by radical cultural sports group
टॅग Kabaddi
Next Stories
1 गैरवर्तणुकीबद्दल पाकिस्तानी खेळाडूंनी माफी मागावी -सरदार सिंग
2 दक्षिण आफ्रिकेचा गुलाम बोदी वादाच्या भोवऱ्यात
3 उत्तेजकाचे सेवन करणाऱ्यांवर मोझेस यांची टीका
Just Now!
X