मावळी मंडळातर्फे आयोजित ६२व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात श्री केदारनाथ, जय भवानी तरुण मंडळ, एकता क्रीडा मंडळ तर महिलांमध्ये स्फूर्ती सेवा मंडळ, टागोरनगर क्रीडा मंडळ यांनी विजयी सलामी दिली. पुरुष गटाच्या अटीतटीच्या लढतीत अलाहिदा डावात मुंबई उपनगरच्या श्री केदारनाथ क्रीडा मंडळाने मुंबई शहरच्या श्रीराम कबड्डी संघाचा ९-३ असा ६ गुणांनी पराभव केला. अलाहिदा डावात केदारनाथच्या निखिलने बोनस टाकून २ गुणांची कमाई केली आणि संघाला विजय मिळवून दिला. मुंबई उपनगरच्या जय भवानी तरुण मंडळाने ठाण्याच्या भारत स्पोर्ट्स क्लबचा ३३-२५ असा पराभव केला. मनोज चव्हाण, देवेंद्र कदम यांनी सुरेख खेळ केला. एकता क्रीडा मंडळाने युवा क्रीडा मंडळ संघाचा ४१-१२ असा पराभव केला. महिलांमध्ये स्फूर्ती सेवा मंडळाने सन्मित्र क्रीडा मंडळाचा ६७-३७ असा धुव्वा उडवला. स्फूर्ती संघातर्फे स्मिता बामणे, श्रद्धा चव्हाण यांनी सुरेख खेळ केला. टागोरनगर संघाने शिव समर्थ ठाणे संघाचा ४३-२१ असा पराभव केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 12:58 pm