25 January 2021

News Flash

भारताविरुद्ध वन-डे मालिकेतून कगिसो रबाडा बाहेर

रबाडा ४ आठवडे मैदानाबाहेर

भारताविरुद्ध वन-डे मालिका सुरु होण्याआधीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला धक्का बसलेला आहे. आफ्रिकेच्या संघाचा प्रमुख गोलंदाज कगिसो रबाडा मांड्यांना झालेल्या दुखापतीमुळे भारताविरुद्ध वन-डे मालिकेत खेळू शकणार नाहीये. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेत कगिसो रबाडाला ही दुखापत झाली. त्याआधीही रबाडाला इंग्लंडविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती. डॉक्टरांनी रबाडाला किमान चार आठवड्यांची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

१२ मार्चपासून भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. धर्मशाळा येथे पहिला वन-डे सामना खेळवला जाणार आहे. यानंतर १५ तारखेला भारत लखनऊमध्ये दुसरा तर १८ तारखेला कोलकात्यात तिसरा वन-डे सामना खेळेल.

अवश्य वाचा – Asia XI T20Is : भारतीय खेळाडूंच्या नावावर BCCI कडून अद्याप शिक्कामोर्तब नाही

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 29, 2020 11:28 am

Web Title: kagiso rabada ruled out of odi series against australia and india due to groin injury psd 91
Next Stories
1 T20 World Cup IND vs SL : शफालीचा धडाका; भारताचा विजयी ‘चौकार’
2 Video : पृथ्वीला माघारी धाडण्यासाठी लॅथमची कसरत, हा भन्नाट झेल एकदा पाहाच…
3 Ind vs NZ : अपयश विराटची पाठ सोडेना, सलग दुसऱ्या कसोटीत स्वस्तात बाद
Just Now!
X