News Flash

राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धा : काजल, घुफ्रान अजिंक्य

मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुरुष एकेरीचे आणि काजल कुमारीने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले

काजल कुमारी व महम्मद घुफ्रान.

मुंबई : रत्नागिरी येथे झालेल्या शिवशाही चषक राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत मुंबईच्या महम्मद घुफ्रानने पुरुष एकेरीचे आणि काजल कुमारीने महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात घुफ्रानने मुंबईच्या विश्वविजेत्या प्रशांत मोरेचा २५-१०, २५-४ असा धुव्वा उडवला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या संदीप देवरूखकरने ठाण्याच्या राजेश गोहिलवर १८-११, १९-१८ अशी मात केली. महिलांच्या अंतिम सामन्यात काजलने मुंबईच्या नीलम घोडकेवर चुरशीच्या लढतीत १२-२१, २५-७, २५-१५ असा निसटता विजय मिळवला. तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत मुंबईच्या ऐशा खोकावालाने रत्नाागिरीच्या मैत्रेयी गोगटेवर २४-०, १५-१४ असा विजय मिळवला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 12:07 am

Web Title: kajal ghufran won state championship carrom competition title zws 70
Next Stories
1 आयर्लंडच्या नावावर लाजीरवाण्या विक्रमाची नोंद
2 Video : अशी विचित्र स्टंपिंग कधी पाहिली आहे का?
3 पाकिस्तानी गोलंदाज मोहम्मद आमीरची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती
Just Now!
X