News Flash

जार्विसने उडवली वेस्ट इंडिजची दैना

झिम्बाब्वेच्या कायले जर्विसने चार विकेट्स घेत वेस्ट इंडिजची पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चांगली दैना उडवली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेचा डाव २११ धावांमध्ये संपुष्टात आला.

| March 14, 2013 03:43 am

झिम्बाब्वेच्या कायले जर्विसने चार विकेट्स घेत वेस्ट इंडिजची पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी चांगली दैना उडवली. पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेचा डाव २११ धावांमध्ये संपुष्टात आला. टिनो मावोयोने सात चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ५० धावांची खेळी साकारली. या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर ख्रिस गेलने आठ चौकारांच्या मदतीने ४० धावांची खेळी साकारली खरी, पण भेदक गोलंदाजीच्या जोरावर जर्विसने वेस्ट इंडिजची ३ बाद ४३ अशी अवस्था केली. मालरेन सॅम्युअल्सने ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ५१ धावांची खेळी साकारत संघाला सावरले. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा वेस्ट इंडजची ६ बाद १८१ अशी अवस्था होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 3:43 am

Web Title: kaley jarvis takes the four wickets of west indies
Next Stories
1 मुंबईच्या अभिषेक नायरने टाकले एका षटकात १७ चेंडू
2 चौथ्या कसोटीपूर्वी वॉटसन भारतात परतेल – मायकल क्लार्कला विश्वास
3 भारताचा पाकिस्तानवर विजय
Just Now!
X