10 August 2020

News Flash

कल्पेश कोळी क्रिकेट स्पर्धा ४ मेपासून

न्यू हिंद स्पोर्टिग क्लबतर्फे २३वी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा ४ मेपासून आयोजित करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेला ४ मे

| April 25, 2013 03:49 am

न्यू हिंद स्पोर्टिग क्लबतर्फे २३वी कल्पेश कोळी स्मृती क्रिकेट स्पर्धा ४ मेपासून आयोजित करण्यात आली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धेला ४ मे रोजी माटुंगा येथील मेजर रमेश दडकर मैदानात सुरुवात होईल. स्पर्धेतील प्रत्येक सामना दोन दिवसांचा असून तो साखळी आणि बाद पद्धतीने खेळवण्यात येईल. या स्पर्धेत २७ सामने होणार असून स्पर्धा विरार, डहाणू, चेंबूर, वांद्रे आणि माटुंगा येथे होतील.
वयचोरीबाबत एमसीएला सूचना
खेळाडूंच्या वयचोरीचा त्रास होऊ नये, यासाठी न्यू हिंद स्पोर्टिग क्लबकडून मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) काही सूचना करण्यात आल्या आहेत. प्रशिक्षकाने योग्य वयाचा दाखला पडताळून खेळाडूंची निवड करावी. वयाचा दाखला मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील असावा. दाखल्याची नोंदणी जन्मतारखेपासून एक वर्षांच्या आतील असावी. मुंबईबाहेरील दाखला आणणाऱ्या खेळाडूंचा स्पर्धेसाठी विचार करू नये तसेच बाहेरगावचे खेळाडू किमान दोन वर्षे तरी मुंबईत राहत असावेत, अशा सूचना एमसीएला करण्यात आल्या आहेत. मात्र एमसीएकडून अद्याप कोणतेही प्रत्युत्तर संयोजकांना मिळालेले नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 25, 2013 3:49 am

Web Title: kalpesh koli cricket competition from 4th may
Next Stories
1 सायना, सिंधूची विजयी सलामी
2 पुणे, जळगाव, नागपूरची विजयी सुरुवात
3 दर्शन!
Just Now!
X