07 March 2021

News Flash

केन विल्यमसनच्या घरी चिमुकलीचं आगमन

गोंडस मुलीचं आगमन

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं आहे. कन्यारत्न झाल्याची माहिती विल्यमसन यानं आपल्या इन्स्टाग्रामवरुन दिली आहे. आमच्या कुटुंबात एक सुंदर मुलीचे स्वागत करताना आनंद गगणात मावत नव्हता, अशी पोस्ट विल्यमसन यानं केली आहे.

विल्यमसन यानं इन्स्टाग्रामवर मुलीला हृदयाशी लावलेला फोटो पोस्ट केला आहे. त्याखाली सुंदर असं कॅप्शनही टाकलं आहे. आयसीसी, न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आणि हैदराबाद संघासह अनेक खेळाडूंनी विल्यमसनचं अभिनंदन केलं आहे.


पहिल्यांदाच वडील होणार असल्यामुळे केन विल्यमसन यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सुट्टी घेतली होती. विडिजबरोबरील होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यातून विल्यमसन यानं माघार घेतली होती. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डानेही विल्यमसनच्या निर्णायचं स्वागत करत त्याला सुट्टी मंजूर केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 1:20 pm

Web Title: kane williamson announces the birth of his first child nck 90
Next Stories
1 रात्र ऑस्ट्रेलियाची आहे… Day Night कसोटीमधील कांगारुंचा विराट विक्रम भारताला धडकी भरवणाराच
2 मुंबईकर पृथ्वी शॉची भन्नाट गोलंदाजी; भारतीय खेळाडूही झाले अवाक्
3 एकमेव कसोटीत कोहलीला विराट विक्रम करण्याची संधी
Just Now!
X