News Flash

दुर्दैवच अजून काय! दुखापतीमुळे केन विल्यमसन गमावणार पहिला नंबर

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू घेणार विल्यमसनची जागा

केन विल्यमसन

इंग्लंडविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीपूर्वी न्यूझीलंडच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. दुखापतीमुळे कर्णधार केन विल्यमसनला बर्मिंगहॅम कसोटीतून बाहेर पडावे लागले आहे. विल्यमसनला हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली असून त्याला दुसर्‍या कसोटीसाठी विश्रांती देण्यात आली आहे. टॉम लॅथम आता न्यूझीलंडचा पदभार स्वीकारेल, तर विल्यमसनच्या जागी विल यंगला संघात संधी मिळणार आहे. दुसऱ्या कसोटीत खेळू न शकल्याने विल्यमसनचे कसोटीतील पहिले स्थानही जाणार आहे.

हेही वाचा – IPL : कोलकाता नाइट रायडर्स संघ आपल्याच कर्णधाराची करणार उचलबांगडी?

दुसऱ्या कसोटीत न खेळल्यामुळे विल्यमसनला ९ गुणांचा तोटा होईल, त्यामुळे तो दुसऱ्या क्रमांकावर सरकेल. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथ कसोटी क्रमवारीतील फलंदाजांमध्ये अव्वल स्थान पटकावेल. केन विल्यमसनचे सध्या ८९५ रेटिंग गुण आहेत. दुसर्‍या कसोटीत न खेळता, त्याचे हे गुण ८८६ होतील. अशा प्रकारे स्टीव्ह स्मिथ विल्यमसनला ५ गुणांनी मागे टाकेल, कारण त्याच्याकडे ८९१ रेटिंग गुण आहेत.

 

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केन विल्यमसन फ्लॉप ठरला. त्याला पहिल्या डावात १३ धावा आणि दुसऱ्या डावात फक्त १ धाव करता आली. पहिल्या डावात त्याला जेम्स अँडरसनने, तर दुसऱ्या डावात त्याला ओली रॉबिनसनने बाद केले.

हेही वाचा – नवऱ्याच्या संघातील क्रिकेटपटूचा ‘गजनी’ लूक पाहून साक्षी धोनी झाली ‘इम्प्रेस’!

विल्यमसनला दुसर्‍या कसोटी सामन्यातून वगळल्याबद्दल न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टिड म्हणाले, ”जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यामुळे त्याला विश्रांती देण्यात आली आहे. विल्यमसनला दुसर्‍या कसोटी सामन्यात विश्रांती देण्याचा निर्णय घेणे तितका सोपा निर्णय नव्हता, परंतु तो नक्कीच योग्य आहे. त्याला इंजेक्शन देण्यात आले होते आणि फलंदाजी करतानाही त्याचा हात दुखत होता. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यास पाहता विल्यमसनला विश्रांती देण्याचा योग्य निर्णय आहे. आम्हाला खात्री आहे की विल्यमसन अंतिम सामना खेळेल.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 11:24 am

Web Title: kane williamson ruled out of second test against england adn 96
Next Stories
1 IPL : कोलकाता नाइट रायडर्स संघ आपल्याच कर्णधाराची करणार उचलबांगडी?
2 नवऱ्याच्या संघातील क्रिकेटपटूचा ‘गजनी’ लूक पाहून साक्षी धोनी झाली ‘इम्प्रेस’!
3 फ्रेंच ओपनमध्ये रंगणार ‘एल-क्लासिको’ सामना, जोकोविच आणि नदाल असणार आमनेसामने
Just Now!
X