पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि नेहमी आपल्या विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या जावेद मियाँदादने, दानिश कनेरियावर टीका केली आहे. दानिश हा पैशांसाठी काहीही करु शकतो आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे लोकं त्याच्यावर विश्वास ठेवत आहेत, मियाँदाद यांनी पीटीआय वृत्तसंस्थेला प्रतिक्रीया दिली.

काय म्हणाले मियाँदाद ??

“त्यांना नेमकं काय सिद्ध करायचं आहे हेच समजत नाही. पण कनेरियाबद्दल विचारत असाल तर तो पैशांसाठी काहीही करु शकतो. महत्वाची गोष्ट म्हणजे लोकंही अशा व्यक्तीवर विश्वास ठेवत आहेत, ज्याच्यावर फिक्सींगमुळे बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये कनेरियाला आता कसलंही महत्व उरलेलं नाही.”

क्रिकेटमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या खेळाडूवर तुम्ही विश्वास कसा ठेवता?? देशाची मान कोणामुळे खाली गेली?? २००० सालच्या सुरुवातीच्या काळात मी पाकिस्तानचा मुख्य प्रशिक्षक होतो, मला एकदाही असं जाणवलं नाही की दानिश हिंदु असल्यामुळे त्याला त्रास दिला जातोय.

शोएब अख्तरने समोर आणलं होतं प्रकरण –

रावळपिंडी एक्स्प्रेस शोएब अख्तरने एका चॅट शोमध्ये बोलताना दानिश कनेरिया हिंदू असल्याने इतर पाकिस्तानी खेळाडू त्याला योग्य वागणूक देत नव्हते असा खुलासा केला होता. यानंतर ज्यांनी आपल्याला अपमानास्पद वागणूक दिली त्यांची नावं जाहीर करणार असल्याचं दानिशने जाहीर केलं आहे.

अवश्य वाचा – धर्म बदलण्याचा विचार मनात कधीही आला नाही -कनेरिया