News Flash

ट्रॅकवरील अपघातामुळे कार्तिकेयनची निराशा

पात्रता फेरीत सनसनाटी सुरुवात करूनही भारताच्या नरेन कार्तिकेयनला ट्रॅकवरील अपघातामुळे सुपर फॉम्र्युला शर्यतीत निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले

| April 14, 2014 04:14 am

पात्रता फेरीत सनसनाटी सुरुवात करूनही भारताच्या नरेन कार्तिकेयनला ट्रॅकवरील अपघातामुळे सुपर फॉम्र्युला शर्यतीत निराशाजनक कामगिरीला सामोरे जावे लागले. लोईक दुवल याच्याशी झालेल्या अपघातामुळे त्याला पहिल्या पाच जणांमध्ये स्थान मिळविता आले नाही.
कार्तिकेयनने शनिवारी पात्रता फेरीत दुसरे स्थान मिळवले होते. त्यामुळे त्याच्या कामगिरीविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र रविवारी सराव करताना दुवलच्या मोटारीला धक्का दिल्यामुळे त्याला पाचव्या क्रमांकावरून सुरुवात करावी लागली.
शर्यतीनंतर नरेन म्हणाला, ‘‘या शर्यतीत मला चांगले स्थान मिळण्याची अपेक्षा होती. मात्र नकळत झालेल्या चुकीबद्दल मला पाचव्या क्रमांकावर फेकण्यात आले. त्यामुळे पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळविण्याच्या माझ्या आशा धुळीस मिळाल्या.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 14, 2014 4:14 am

Web Title: karthikeyan rues disappointing end
Next Stories
1 लिव्हरपूलची मँचेस्टर सिटीवर मात
2 सचिन, सौरव फुटबॉलच्या मैदानात
3 तेंडुलकर, गांगुली फुटबॉल संघांचे मालक
Just Now!
X