19 September 2020

News Flash

VIDEO : बाऊन्सर खेळाडूच्या मानेवर आदळला अन् … काळजाचा ठोका चुकला

थोडक्यात बचावला

कॅनबेरा इथे सुरू असलेल्या ऑस्ट्रेलियाविरोधच्या कसोटी सामन्यादरम्यान श्रीलंका संघाचा फलंदाज दिमूथ करूणारत्ने चेंडू मानेवर लागल्यामुळे मैदानावर पडला. सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांचा आणि मैदानावरील खेळाडूंचा काही वेळासाठी काळजाचा ठेका चुकाला होता.

वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने टाकलेला बाऊन्सर करूणारत्ने समजलाच नाही. चेंडू सरळ त्याच्या मानेच्या थोड्यावरच्या बाजूला आदळला. चेंडू लागल्यानंतर करूणारत्ने खेळपट्टीवरच कोसळला. त्याला वेदना असाह्य होत होत्या. तो खाणाखुणा करून सांगण्याचा प्रयत्न करायला लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तातडीने वैद्यकीय पथक मैदानात पोहोचले.

अखेर दिमूथला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं असून सध्या त्याची प्रकृती कशी आहे, याबाबत माहिती मिळू शकलेली नाहीये.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेने तीन गड्यांच्या मोबदल्यात १२३ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाकडे अद्याप ४११ धावांची आघाडी आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2019 5:49 pm

Web Title: karunaratne cops a bouncer from cummins
Next Stories
1 मराठमोळी स्मृती ICC Rankingमध्ये अव्वल स्थानावर
2 अखेरच्या सामन्यात धोनी खेळणार, ‘या’ खेळाडूला मिळणार डच्चू?
3 अखेरच्या वनडेआधी न्यूझीलंडला मोठा धक्का
Just Now!
X