News Flash

कश्यप सातवें आसमाँ पर..

लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या पी. कश्यपने विश्व बॅडमिंटन क्रमवारीत पुरुषांच्या गटात कारकिर्दीतील सर्वोत्तम असे सातवे स्थान पटकावले आहे.

| April 12, 2013 05:30 am

लंडन ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत पोहोचलेल्या पी. कश्यपने विश्व बॅडमिंटन क्रमवारीत पुरुषांच्या गटात कारकिर्दीतील सर्वोत्तम असे सातवे स्थान पटकावले आहे. हैदराबादच्या या गुणी युवा खेळाडूने या वेळी चीनच्या चेन जीन याला मागे टाकत सातवा क्रमांक पटकावला, तर महिलांच्या गटात ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायना नेहवालने दुसरे स्थान कायम राखले आहे. या क्रमवारीत पुरुषांच्या गटात मुंबईच्या अजय जयरामने ३० वे स्थान कायम राखले आहे.
महिलांच्या गटात सायनाने आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च दुसऱ्या क्रमांकावरकोणालाही कब्जा करू दिलेला नाही. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती चीनची ली झेरुई हिने पहिले स्थान कायम राखले आहे. मुंबईची युवा बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने क्रमवारीतील १६ वे स्थान कायम राखले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 5:30 am

Web Title: kashyap on the seventh rank
टॅग : Olympic,Sports
Next Stories
1 महिला क्रिकेटपटूंची उपेक्षा
2 .. तर संघ आदेशाची पायमल्ली करेन- वेटेल
3 सेहवागचे भारतीय संघात पुनरागमन अशक्य- जेफ्री बॉयकॉट
Just Now!
X