29 September 2020

News Flash

आशियाई बॅडमिंटन स्पर्धा : कश्यपची विजयी सलामी

भारताच्या पारुपल्ली कश्यपने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत विजयी सलामी केली. मात्र राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांना पहिल्याच फेरीत पराभवास सामोरे

| April 22, 2015 12:10 pm

भारताच्या पारुपल्ली कश्यपने आशियाई बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीत विजयी सलामी केली. मात्र राष्ट्रकुल रौप्यपदक विजेत्या ज्वाला गट्टा व अश्विनी पोनप्पा यांना पहिल्याच फेरीत पराभवास सामोरे जावे लागले.
राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता कश्यपने सिंगापूरच्या झेई लियांग डेरेकचा २१-१७, २१-१३ असा सरळ दोन गेम्समध्ये पराभव केला. हा सामना त्याने केवळ ३९ मिनिटांमध्ये जिंकला. २८ वर्षीय कश्यपला पुढच्या फेरीत चीन तैपेई संघाच्या याचिंग हिसु याच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. कश्यपने हिसू याच्याविरुद्ध आतापर्यंत दोन वेळा विजय मिळविला आहे. यंदा त्याने इंडिया ओपन स्पर्धेत त्याला हरविले होते.
कश्यपने डेरेकविरुद्ध पहिल्या गेममध्ये ४-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर ९-९ अशा बरोबरीपर्यंत डेरेकने कश्यपला चांगली झुंज दिली. मात्र त्यानंतर कश्यपने खेळावर नियंत्रण ठेवीत पहिली गेम घेतली. दुसऱ्या गेममध्येही कश्यपने ड्रॉपशॉट्स व अचूक प्लेसिंग असा खेळ करीत ही गेम सहज घेत सामना जिंकला.
यंदा निराशाजनक कामगिरी करणाऱ्या ज्वाला व अश्विनी यांच्यावर या स्पर्धेतही पहिल्याच फेरीत पराभूत होण्याची नामुष्की स्वीकारावी लागली. त्यांना चीन तैपेई देशाच्या युओ पोपेई व याचिंग हिसुई यांनी २१-१७, १५-२१, २१-१५ असे हरविले.

या सामन्यातील खेळाबाबत मी समाधानी आहे. विविध स्ट्रोक्स मारताना माझ्या हालचाली झटपट होत होत्या. या सामन्यातील विजयामुळे माझा आत्मविश्वास उंचावला आहे. त्याचा फायदा मला पुढच्या फेरीसाठी होईल.
पारुपल्ली कश्यप, भारताचा बॅडमिंटनपटू.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2015 12:10 pm

Web Title: kashyap won the opening match in asian badminton championship
टॅग Parupalli Kashyap
Next Stories
1 पाकिस्तानमध्ये क्रिकेटची घरवापसी
2 वरिष्ठ राष्ट्रीय हॉकी स्पर्धा : महाराष्ट्राची हरयाणावर मात; मुंबई, कॅग संघांची आगेकूच
3 न्यूझीलंडमधील स्पर्धेतून आम्ही खूप शिकलो – रितू राणी
Just Now!
X