आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारल्यानंतर विरेंद्र सेहवाग समालोचनाकडे वळला आहे. याव्यतिरीक्त सेहवाग गेल्या काही वर्षांमध्ये ट्विटरवर चांगलाच सक्रीय असतो. विविध विषयांवर सेहवाग आपल्या खास शैलीतून ट्विट करतो, आणि चाहत्यांचाही त्याला प्रतिसाद मिळतो. विरेंद्र सेहवागने नुकतच आपल्या ट्विटर अकाऊंटवर, बीसीसीआयच्या निवड समितीला लक्ष्य करत खोचक शब्दांत ट्विट केलं आहे.

मलाही निवड समितीचा सदस्य व्हायचं, कोण संधी देईल? असा प्रश्न सेहवागने विचारला आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे अनेक चाहत्यांनी विरुच्या या ट्विटला चांगला प्रतिसाद दिला आहे.

एम.एस.के. प्रसाद यांची निवड समिती गेल्या काही दिवसांमध्ये चुकीच्या कारणांसाठी चर्चेत आहे. विश्वचषक संघनिवडीदरम्यान निवड समितीवर अनेकांनी टीका केली होती. अंबाती रायुडू, अजिंक्य रहाणे यासारख्या अनुभवी खेळाडूंना निवस समितीने संघात स्थान दिलं नव्हतं. या पार्श्वभूमीवर सेहवागचं हे ट्विट खूप महत्वाचं मानलं जात आहे.