आंतरराष्ट्रीय बिलिअर्ड्स आणि स्नूकर महासंघाच्या (आयबीएसएफ) वतीने रशियातील सेंट पीटर्सबर्गला झालेल्या १६ वर्षांखालील गटाच्या जागतिक स्नूकर स्पर्धेमध्ये भारताच्या कीर्तना पांडियन हिने मुलींचे, मुलांमध्ये बेल्जियमच्या बेन मार्टेन्सने बाजी मारली.

कीर्तनाने विजेतेपद पटकावताना बेलारूसच्या अलबिना लेसचुक हिचा ३-१ असा पराभव केला. या स्पर्धेसाठी चौथे मानांकन मिळालेल्या कीर्तनाने प्राथमिक फेऱ्यांमध्ये रशियाच्या अलीना खाएरूलीना आणि मनस्विनी शेखर यांना ३-० असे पराभूत करून उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य सामन्यात कीर्तनाने भारताच्याच अनुपमा रामचंद्रनला ३-१ असे पराभूत करीत अंतिम फेरी गाठली होती. अंतिम सामन्यातही कीर्तनाने पहिला गेम गमावल्यानंतर सलग तीन गेम जिंकत अंतिम विजेतेपदावर मोहर उमटवली.