भारत दौऱ्यावरील मालिकेत विजयासाठी झगडणाऱ्या वेस्ट इंडिज संघाला रविवारी दुखापतीमुळे दोन धक्के बसले आहेत. वेगवान गोलंदाज केमार रोचने दुखापतीमुळे उर्वरित मालिकेतून माघार घेतली आहे आणि अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने एकदिवसीय मालिकेसाठी आपण अनुपलब्ध असल्याचे कळवले आहे. वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रिएल याची  संघात रोचच्या जागी निवड झाली आहे.
खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे रोचला भारताविरुद्धची दुसरी कसोटी आणि एकदिवसीय मालिकेत खेळता येणार नाही. याचप्रमाणे दुखापतीमुळे पोलार्डला एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. वेस्ट इंडिज संघाचे फिजिओथेरपिस्ट सी. जे. क्लार्क यांनी सांगितले की, ‘‘पहिल्या कसोटीत खेळू न शकलेल्या रोचची दुखापत अपेक्षित कालावधीत बरी होऊ शकली नाही. छ’
वेस्ट इंडिजचा एकदिवसीय संघ :
ड्वेन ब्राव्हो (कर्णधार), टिनो बेस्ट, डॅरेन ब्राव्हो, जॉन्सन चार्ल्स, नरसिंग देवनरिन, ख्रिस गेल, जेसॉन होल्डर, सुनील नरिन, वीरासॅमी परमॉल, किरान पॉवेल, दिनेश रामदिन, रवी रामपॉल, डॅरेन सॅमी, मार्लन सॅम्युअल्स आणि लेंडन सिमॉन्स.