11 August 2020

News Flash

विराटची मस्करी पडली महागात, ‘तो’ स्वत:च झाला ट्रोल

पाहा नक्की काय घडला प्रकार

करोनाच्या भीतीने सुमारे चार महिने बंद असलेलं आंतरराष्ट्रीय क्रिकेट इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेच्या रूपाने सुरू झालं. क्रिकेटच्या पुनरागमनानंतर पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने सहा बळी घेत इंग्लंडचं कंबरडं मोडलं. इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपल्यानंतर वेस्ट इंडिजने पहिल्या डावात ३१८ धावा केल्या आणि ११४ धावांची आघाडी घेतली.

इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी सामन्याचा आधार घेत इंग्लंडचा कौंटी क्लब असलेल्या केंट क्रिकेटने भारतीय कर्णधार विराट कोहली याची मस्करी करण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडच्या जो डेन्टलीने सामन्यात पहिल्या डावात १४ धावा केल्या. त्याच्या १४ धावांची तुलना करताना केन्ट क्रिकेटने लिहिले की लॉकडाउनंतरच्या काळातील धावा जो डेन्टली १४ तर विराट कोहली शून्य. या ट्विटमध्ये त्यांनी जो डेन्टलीचा फोटोही पोस्ट केला.

या ट्विटवरून विराटची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न क्रिकेट क्लबने केला. पण चाहत्यांनी क्रिकेट क्लबलाच ट्रोल केलं.

दरम्यान, सामन्यात बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या डावाची सुरूवात खराब झाली, पण स्टोक्सने जोस बटलर आणि डॉम बेस यांच्या साथीने संघाला द्विशतकी मजल मारून दिली. स्टोक्सने सर्वाधिक ४३ धावा केल्या, तर बटलरने ३५ आणि बेसने नाबाद ३१ धावा केल्या. गॅब्रियल आणि होल्डर यांच्या माऱ्यापुढे इंग्लंडचा फार काळ निभाव लागला नाही. इंग्लंडचा पहिला डाव २०४ धावांवर आटोपला. होल्डरने सहा तर गॅब्रियलने ४ गडी बाद केले.

प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा पहिला डाव ३१८ धावांवर संपुष्टात आला. क्रेग ब्रेथवेट (६५) आणि शेन डावरिच (६१) यांनी दमदार अर्धशतके ठोकली. रॉस्टन चेसनेही चांगली खेळी करत ४७ धावा केल्या. या तिघांच्या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजने त्रिशतकी मजल मारली. स्टोक्सने ४, अँडरसनने ३, बेसने २ तर मार्क वूडने १ गडी बाद केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2020 4:08 pm

Web Title: kent cricket club takes a dig at virat kohli gets trolled by netizens vjb 91
Next Stories
1 “संघ नीट निवडत नसाल, तर चमत्काराची अपेक्षा करू नका”
2 स्टीव्ह वॉ म्हणतो, “भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका म्हणजे…”
3 Flashback : आजच सर ब्रॅडमन यांनी रचला होता इतिहास
Just Now!
X