News Flash

केनियाचे वर्चस्व

केनियाच्या जेफ्री किपसंग व ल्युसी काबुऊ यांनी विक्रमी वेळेत शर्यत पूर्ण करीत टीसीएस जागतिक दहा किमी अंतराच्या शर्यतीत अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद मिळविले.

| May 19, 2014 07:20 am

केनियाच्या जेफ्री किपसंग व ल्युसी काबुऊ यांनी विक्रमी वेळेत शर्यत पूर्ण करीत टीसीएस जागतिक दहा किमी अंतराच्या शर्यतीत अनुक्रमे पुरुष व महिला गटात विजेतेपद मिळविले.
किपसंगने ही शर्यत २७ मिनिटे ४४ सेकंदात पार केली. युगांडाचा जोशुआ चेपतेगेई (२८ मिनिटे २४ सेकंद) व इथिओपियाचा किंडे अतानावु (२८ मिनिटे ३५ सेकंद) यांना अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळाले. भारतीय खेळाडूंमध्ये बी.सी.तिलक (३० मिनिटे २६ सेकंद) याने अजिंक्यपद मिळविले तर अनीष थापा व नितेंद्रसिंग रावत यांना अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान मिळाले.
महिलांमध्ये ल्युसी हिने ही शर्यत ३१ मिनिटे ४८ सेकंदात पार केली. तिच्याच सहकारी जॉयसी चेपकिरुई (३१ मिनिटे ५५ सेकंद) व लिनेट मसाई (३२ मिनिटे २८ सेकंद) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक मिळवित आपल्या देशाचे वर्चस्व राखले. भारतीय खेळाडूंमध्ये महाराष्ट्राच्या स्वाती गाढवे हिने प्रथम क्रमांक मिळविताना ही शर्यत ३७ मिनिटे २२ सेकंदात पार केली.
जयश्री बोरगे (३७ मिनिटे ३५ सेकंद) व सुप्रिया पाटील (३७ मिनिटे ४६ सेकंद) यांनी अनुक्रमे दुसरे व तिसरे स्थान घेतले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2014 7:20 am

Web Title: kenyan runners set to dominate world 10k bangalore
Next Stories
1 फक्त विश्वचषकवारी!
2 चित्तथरारक!
3 खडतर मुकाबल्यासाठी भारत सज्ज
Just Now!
X