News Flash

कोहलीची बोलती बंद करणारा केजरिक विल्यम्स आयपीएल लिलावात सहभागी होणार

१९ डिसेंबरला कोलकात्यात रंगणार लिलाव

वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज केजरिक विल्यम्सने आयपीएलच्या आगामी हंगामाच्या लिलावात सहभागी होणार आहे. संघमालकांनी मिळून २४ खेळाडूंची यादी गव्हर्निंग काऊन्सिलकडे दिली होती, या २४ खेळाडूंच्या यादीत विल्यम्सचं नाव सहभागी आहे.

भारताविरुद्ध पार पडलेल्या टी-२० मालिकेत विराट कोहली आणि केजरिक विल्यम्स यांच्यातलं द्वंद्व चांगलच गाजलं. विंडीज दौऱ्यात विल्यम्सने बाद केल्यानंतर केलेल्या सेलिब्रेशनचा बदला विराटने पहिल्या टी-२० सामन्यात घेतला. विल्यम्सच्या ट्रेडमार्क नोटबूक सेलिब्रेशन स्टाईलने विराटने पहिल्याच सामन्यात धडाकेबाज सुरुवात केली. यानंतर दुसऱ्या सामन्यात विराट कोहलीला स्वस्तात बाद करत विल्यम्सने तोंडावर बोट ठेवत फिट्टमफाट केली होती.

कॅरेबिअन प्रमिअर लिग आणि विंडीकडून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये खेळत असताना विल्यम्सची कामगिरी वाखणण्याजोगी होती. त्यामुळे आगामी आयपीएल हंगामात कोणता संघ विल्यम्सवर बोली लावतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 12, 2019 11:30 am

Web Title: kesrick williams included in the list of players for upcoming ipl auction psd 91
Next Stories
1 Video : विल्यम्सच्या गोलंदाजीवर विराटचा खणखणीत षटकार, नंतर स्वतःच झाला अवाक
2 IND vs WI : रोहित-राहुलच्या शतकी भागीदारीमुळे टीम इंडियाची ऑस्ट्रेलियाशी बरोबरी
3 टी-२० क्रिकेटमध्ये ‘मालिकावीर’ विराट कोहलीचा षटकार
Just Now!
X