प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत केव्हिन अँडरसन याने जॉन इस्नरला नमवून प्रथमच अंतिम फेरीमध्ये धडक दिली आहे. विशेष म्हणजे ही लढत सुमारे साडे सहा तासांपर्यंत रंगली. यामध्ये ७-६, ६-५, ६-७, ६-४, २६-२४ अशा फरकाने अँडरसनने यात बाजी मारली. विम्बल्डनमधील ही अजून एक सर्वाधिक काळ झालेली लढत ठरली आहे.

या स्पर्धेतील पहिला खेळ अँडरसनने टायब्रेकरमध्ये घेतला. मात्र, अमेरिकेच्या इस्नरने पुढील दोन्ही खेळ जिंकत सामन्यात आघाडी घेतली. टायब्रेकरमध्ये गेलेल्या या दोन्ही सेट्सनंतर तिसरा सेटही टायब्रेकरमध्ये ११-९ असा गेला. त्यामुळे ०-१ असा पिछाडीवर असलेल्या इस्नरने २-१ ने आघाडी घेतली. त्यामुळे चौथ्या सेटपूर्वी इस्नरचेच पारडे जड वाटत होते. मात्र, फेडररला झुंजवणा-या अँडरसनने चौथा सेट ६-४ असा जिंकत सामन्यात आव्हान कायम ठेवले. त्यानंतर मात्र, शेवटच्या पाचव्या सेटमध्ये ७-६, ६-५, ६-७, ६-४, २६-२४ अशा फरकाने अँडरसनने इस्नरवर विजय मिळवला.

या विजयानंतर अँडरसन हा ९७ वर्षांनंतर अंतिम फेरीत दाखल होणार दक्षिण अफ्रिकेचा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. या ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये शुक्रवारी झालेल्या उपांत्य फेरीची मॅरेथॉन झुंज अँडरसनने इस्नरवर मात करीत तब्बल ६ तास ३५ मिनिटांची जिंकली.

यापूर्वी इस्नरने २०१०मध्ये झालेल्या विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या पहिल्या राऊंडमध्ये तब्बल ११ तास पाच मिनिटांचा कालावधी घेत निकोलस माहूतला नमवले होते. दरम्यान, आजच्या सामन्यात विजेता ठरलेला ३२ वर्षीय अँडरसन हा ब्रायन नॉर्टन (१९२१) यांच्यानंतर विम्बल्डनच्या पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला दक्षिण अफ्रिकन खेळाडू ठरला आहे.