ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या वन-डे सामन्यात भारतीय संघाने ८ धावांनी विजय मिळवत, मालिकेत २-० ने आघाडी घेतली. कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात शतक झळकावत भारताला २५० धावांपर्यंत मजल मारुन दिली. कोहलीने आपल्या कारकिर्दीतलं ४० वं शतक झळकावलं. या विजयानंतर कोहलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर संघाचं कौतुक करणारा मेसेज टाकला.

 

View this post on Instagram

 

Stellar performances, exceptional teamwork!

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

यावर प्रतिक्रीया देताना इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पिटरसनने विराटला King असं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे.

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी दिलेलं २५१ धावांचं लक्ष्य त्यांना झेपलं नाही. कुलदीप यादव-जसप्रीत बुमराह आणि अखेरच्या षटकात विजय शंकरने केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने सामन्यात बाजी मारली.

अवश्य वाचा – IND vs AUS : आता तुझा सामना सुपरमॅनसोबत ! मुंबई इंडियन्सचं विराटला अनोखं आव्हान