05 July 2020

News Flash

कर्णधार विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार जाहीर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अर्जुन पुरस्कार समितीने कर्णधार विराट कोहली आणि मीराबाई चानू यांची शिफारस केली होती.

कर्णधार कोहली याला नुकत्याच झालेल्या इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिकेतील मालिकावीराचा किताब मिळाला होता.विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध ४-१ अशा फरकाने पराभूत झाला. परंतु या मालिकेत त्याने फलंदाजीने सर्व क्रिकेटरसिकांना खुश केले. विराट कोहलीने या मालिकेत सर्वाधिक ५९३ धावा केल्या.

तर मीराबाई चानू हिचीही प्रगती वाखाणण्याजोगी झाली आहे. मीराबाई चानू हिने ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती. ४८ किलो वजनी गटातील वेटलिफ्टींग प्रकारात आपली छाप पाडत तिने भारताला सुवर्णपदक मिळवून दिले होते. याशिवाय, २०१७मध्ये मीराबाई चानू हिने जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये विश्‍वविक्रम नोंदवून जेतेपदाला गवसणी घातली होती. तिने ४८ किलो वजनी गटात १९४ किलो (स्नॅचमध्ये ८५ आणि क्लीन-जर्कमध्ये १०९ किलो) वजन उचलून भारताला दोन दशकांनंतर सुवर्णपदक मिळवून दिले. अशी कामगिरी करणारी चानू दुसरी भारतीय वेटलिफ्टर ठरली होती. २२ वर्षांपूर्वी कर्नाम मल्लेश्‍वरी हिने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्ण कामगिरी केली होती.

पुरस्काराचे मानकरी :
राजीव गांधी खेलरत्न-
एस. मीराबाई चानू (भारोत्तोलन), विराट कोहली- (क्रिकेट)

द्रोणाचार्य पुरस्कार-
सुभेदार चेनंदा अच्चय्या कुटप्पा– (मुष्टियुद्ध), विजय शर्मा– (भारोत्तोलन), ए. श्रीनिवास राव- (टेबल टेनिस), सुखदेव सिंग पन्नू- (धावपटू), क्लॅरेन्स लोबो- हॉकी (जीवनगौरव), तारक सिन्हा- क्रिकेट (जीवनगौरव), जीवन कुमार शर्मा- ज्युडो (जीवनगौरव), व्ही.आर.बीडू- धावपटू (जीवनगौरव).

अर्जुन पुरस्कार-
नीरज चोप्रा (भालाफेकपटू), जीन्सन जॉनसन (धावपटू), हीमा दास (धावपटू), नेलाकुरथी सिक्की रेड्डी (बॅडमिंटन), सतीश कुमार (मुष्टियुद्ध), स्मृती मानधना (क्रिकेट), शुभंकर शर्मा (गोल्फ), मनप्रित सिंग (हॉकी), सविता (हॉकी), कर्नल रवी राठोड (पोलो), राही सरनोबत (नेमबाजी), अंकुर मित्तल (नेमबाजी), श्रेयसी सिंग (नेमबाजी), मनिका बत्रा (टेबल टेनिस), जी. साथियन (टेबल टेनिस), रोहन बोपन्ना (टेनिस), सुमित (कुस्ती), पुजा कडियन (वुशू), अंकूर धामा (पॅरा ॲथलिटिक्स), मनोज सरकार (पॅरा बॅडमिंटन)

ध्यानचंद पुरस्कार –
सत्यदेव प्रसाद (तिरंदाजी), भारत कुमार छेत्री (हॉकी), बॉबी अलॉयसियस (धावपटू), चौगले दादू दत्तात्रय (कुस्ती)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2018 4:45 pm

Web Title: khel ratna award announced to virat kohli
टॅग Virat Kohli
Next Stories
1 Asia Cup 2018 Ind vs Pak : केदार जाधवने केला ‘हा’ विक्रम, ठरला पहिला भारतीय गोलंदाज
2 Asia Cup 2018 : पांड्यापाठोपाठ अक्षर पटेल, शार्दूल ठाकूरही स्पर्धेबाहेर; ‘या’ दोन खेळाडूंना संधी
3 VIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर
Just Now!
X