ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा खो-खो असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने किशोर आणि किशोरी (१४ वर्षांखालील) गटाची राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा आजपासून ठाण्याच्या साकेत येथील पोलीस मदानावर सुरू होणार आहे.
या स्पध्रेची गटवारी अशी
किशोर गट – ‘अ’ गट : सांगली, धुळे, लातूर; ‘ब’ गट : ठाणे, रत्नागिरी, जळगांव; ‘क’ गट : पुणे, औरंगाबाद, नांदेड; ‘ड’ गट : सोलापूर, रायगड, परभणी; ‘इ’ गट : अहमदनगर, सातारा, सिंधुदुर्ग; ‘फ’ गट : पालघर, उस्मानाबाद, नंदुरबार; ‘ग’ गट : बीड, मुंबई, उपनगर, िहगोली; ‘ह’ गट : नाशिक, मुंबई, जालना

किशोरी गट – ‘अ’ गट : अहमदनगर, बीड, पालघर; ‘ब’ गट : ठाणे, औरंगाबाद, रायगड; ‘क’ गट : सांगली, नाशिक, नांदेड; ‘ड’ गट : पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग; ‘इ’ गट : सोलापूर, जळगाव, धुळे; ‘फ’ गट : लातूर, जालना, नंदुरबार; ‘ग’ गट : उस्मानाबाद, रत्नागिरी, िहगोली; ‘ह’ गट : सातारा, मुंबई, उपनगर, परभणी.

आनंद विजयी
जिब्राल्टर : माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंदने जिब्राल्टर बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या फेरीत मॅथिअस बॅचवर विजय मिळवला. पहिल्या फेरीत आनंदला हंगेरीच्या स्झिडोनिआ वजदा लाझार्णेविरुद्ध बरोबरीवर समाधान मानावे लागले होते. दुसऱ्या फेरीत आनंदने विजय साकारला. पी. हरिकृष्णा आणि नतालिआ झुकोव्हा यांच्यातील लढत बरोबरीत संपली. सी. पी. सेतुरामन, अभिजीत गुप्ता आणि संदीपन चंदा यांनी आपापल्या लढती जिंकत दोन गुणांसह आगेकूच केली.