मुंबई इंडियन्सचा व वेस्ट इंडिजचा अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्डचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका युट्यूब व्हिडीओमुळे कायरन पोलार्डचा अपघातात मृत्यू झाल्याच्या चर्चेला उधाण आलं आहे. या व्हिडीओची सत्यता पडताळून पाहिली असता असं काहीही नसल्याचं समोर आलं आहे.
युट्यूबवर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर सत्यता पडताळून पाहिली असता ही बातमी पूर्णत: खोटी आहे. पोलार्ड सध्या अबुधाबी येथे सुरू असलेल्या टी१० लीगमध्ये खेळत आहे. व्हिडीओ व्हायरल झाला त्यावेळी पोलार्ड मैदानावर सामना खेळत होता. पोलार्ड या लीगमध्ये डेक्कन ग्लेडिएटर्स संघाचे नेतृत्व करत आहे. काही नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या खोट्या बातम्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. काही वर्षांपूर्वी सुरेश रैना याच्या अपघाताचाही खोटा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर रैनाने स्वतः पुढे येत ही बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण दिलं होतं.
What The Fuck YOUTUBE #Pollard #T10League pic.twitter.com/R5TFIlTKVw
— Yash Cult Guru™ᴷᴳᶠᶜʰᵃᵖᵗᵉʳ²ᵀᵉᵃˢᵉʳᴼⁿᴶᵃⁿ⁰⁸ (@Yashcultguru) January 28, 2021
सोशल मीडियावर कधी काही व्हायरल होईल याचा नेम नाही. एखादी घटना खरी असो अथवा खोटी, लोक बंद डोळ्यांनी विश्वास ठेवतात. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अथवा सतत समोर येणाऱ्या व्हिडीओ, फोटो अथवा एखाद्या घटनेवर बंद डोळ्यांनी विश्वास ठेवू नका…
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 31, 2021 3:48 pm