26 February 2021

News Flash

जोकोव्हिचच्या जेतेपदात मेदवेदेवचा अडथळा

मेदवेदेवने अव्वल-१० जणांमधील १२ खेळाडूंना पराभूत केले आहे.

गतविजेता नोव्हाक जोकोव्हिच हा ‘मेलबर्न पार्कचा राजा’ म्हणून ओळखला जातो. आठ वेळा अंतिम फेरीत धडक मारणाऱ्या जोकोव्हिचने एकदाही हार पत्करली नाही. त्यामुळे १८व्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी जोकोव्हिच प्रबळ दावेदार असला तरी रविवारी रंगणाऱ्या अंतिम फेरीत क्रमवारीत तिसऱ्या स्थानी मुसंडी मारणाऱ्या डॅनिल मेदवेदेवचा अडथळा त्याला पार करावा लागणार आहे.

अनेकांनी जेतेपदासाठी जोकोव्हिचला पसंती दिली असली तरी सलग २० सामने जिंकण्याची करामत करणारा मेदवेदेव त्याच्यासाठी धोकादायक ठरू शकतो. मेदवेदेवने अव्वल-१० जणांमधील १२ खेळाडूंना पराभूत केले आहे. त्याचबरोबर जोकोव्हिचने मेदवेदेववर चार विजय मिळवले असले तरी मेदवेदेनेही त्याला तीन वेळा पराभूत केले आहे. त्यामुळे रविवारी चाहत्यांना दमदार पर्वणीचा आनंद घेता येणार आहे.

चौथ्या मानांकित मेदवेदेवने अलीकडे पॅरिस मास्टर्स, एटीपी फायनल्स आणि एटीपी चषक जिंकल्याने आता कारकीर्दीतील पहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी तो सज्ज झाला आहे. मेदवेदेवला अमेरिकन खुल्या जेतेपदाने हुलकावणी दिली आहे. जोकोव्हिच नवव्या ऑस्ट्रेलियन जेतेपदासाठी उत्सुक आहे.

१ मेदवेदेव हा मरात सॅफिननंतर (२००५) ऑस्ट्रेलियन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा रशियाचा पहिला टेनिसपटू ठरला आहे. ५जोकोव्हिचने अंतिम फेरीच्या प्रवासापर्यंत तब्बल पाच सेट गमावले असून मेदवेदेवने दोन सेट गमावले आहेत.

आठ वेळा अंतिम फेरी गाठणारा जोकोव्हिच एकदाही हरलेला नाही. त्यामुळे जेतेपद राखण्याचे दडपण त्याच्यावरच असेल. मी माझा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करणार आहे. मी चांगला खेळ केला तर जगातील अव्वल खेळाडूंना पराभूत करू शकतो, याची खात्री आहे. जोकोव्हिच अनुभवी असला तरी मला त्याची फिकीर नाही.    – डॅनिल मेदवेदेव

अव्वल खेळाडूंविरुद्ध सहज विजय मिळवणाऱ्या मेदवेदेवने विजयाची मालिका अखंड राखली आहे. लंडनमध्ये मलाही त्याने सरळ सेटमध्ये पराभूत केले आहे. दमदार सव्‍‌र्हिस तसेच ताकदवान फोरहँड व बॅकहँड असलेल्या मेदवेदेने कामगिरीत प्रचंड सुधारणा केली आहे. त्यामुळे मेदवेदेवला हरवायला मला नक्कीच आवडेल.   – नोव्हाक जोकोव्हिच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2021 12:30 am

Web Title: king of melbourne park winner novak djokovic akp 94
Next Stories
1 रविवार विशेष : किमयागार
2 IPL Auction 2021: “मला नाही वाटत २ कोटी २० लाख रुपयांसाठी स्टीव्ह स्मिथ त्याच्या पत्नीपासून…”
3 पाकिस्तानला भारताकडून हवंय लेखी हमीपत्र, कारण…
Just Now!
X