आज किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना

संघरचना अचूक साकारणे, हे रायझिंग पुणे सुपरजायंट्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीचे प्राथमिक लक्ष्य असते. रविवारी आयपीएल ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेत किंग्ज इलेव्हन पंजाबशी सामना करताना याच गोष्टीकडे धोनी गांभीर्याने लक्ष पुरवत आहे. पहिल्या आयपीएल स्पध्रेत खेळणाऱ्या पुण्याच्या खात्यावर एक विजय आणि एक पराजय आहे, तर दोन्ही सामने गमावणारा पंजाबचा संघ गुणतालिकेत तळाला आहे.

LSG Coach justing langer reaction on Signing Rohit sharma in mega auction
IPL 2024: रोहित शर्माला मेगा लिलावात लखनौ खरेदी करणार? कोच जस्टिन लँगरची भन्नाट प्रतिक्रिया, VIDEO व्हायरल
chandrachud (1)
“लैंगिक भेदभाव संपवा, स्त्रियाही खोल समुद्रात जाऊ शकतात”, कोस्ट गार्डप्रकरणी सुप्रिम कोर्टाने केंद्राला फटकारले
diver artist uma mani began exploring new depths to life at age 49
४९ व्या वर्षी शिकल्या स्कुबा डायव्हिंग; आज समुद्र संरक्षणासाठी करतायत मोलाचे काम; कोण आहेत उमा मणी?
Ruturaj Gaikwad has been fantastic as CSK captain so far says Hussey
IPL 2024 : गावस्कर यांच्यापाठोपाठ आता चेन्नईचे प्रशिक्षक हसीदेखील प्रभावित; ऋतुराज गायकवाड क्रिकेट जाणणारा माणूस

आयपीएलचा नववा हंगाम सुरू होऊन फक्त आठवडाच झाला असल्यामुळे गुणतालिकेत चढ-उतार होऊ शकतात, याची सर्वाना जाणीव आहे. चेन्नई सुपर किंग्जकडे वर्षांनुवष्रे धोनीला अनुकूल ठरणाऱ्या खेळाडूंची सोबत असल्यामुळे संघाच्या कामगिरीत सातत्य दिसायचे. त्यामुळेच गुजरात लायन्सकडून हरल्यानंतर संघरचनेकडे आता नीट पाहावे लागणार आहे, अशी प्रतिक्रिया धोनीने व्यक्त केली.

२००७-०८मधील आर. पी. सिंगच्या गोलंदाजीतील रया आता हरवली आहे. धोनीचा त्याच्यावर विश्वास असला तरी खेळ सुधारण्याची आवश्यकता आहे. इशांत शर्मा ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये कधीच सातत्यपूर्ण कामगिरी करू शकलेला नाही. धोनीकडे याशिवाय इरफान पठाण आणि ईश्वर पांडे हे दोनच वेगवान गोलंदाजीचे पर्याय आहेत. मात्र इरफानसुद्धा आता अपेक्षित कामगिरी करत नाही. पांडेकडे आयपीएल खेळण्याचा पुरेसा अनुभव नाही. मागील सामन्यात अश्विनला पूर्ण चार षटके गोलंदाजी धोनीने दिली. परंतु गेल्या काही दिवसांत अश्विनसुद्धा झगडतो आहे. मात्र पदार्पणातील हंगामात मुरुगन अश्विन मात्र आपली छाप पाडतो आहे.

दुसरीकडे परदेशी खेळाडूंची खराब कामगिरी हे पंजाबच्या कामगिरीचे वैशिष्टय़ आहे. २०१४मध्ये पंजाबने ग्लेन मॅक्सवेल (५५२ धावा) आणि कर्णधार डेव्हिड मिलर (४४६ धावा) यांच्या कामगिरीच्या बळावर चांगले यश मिळवले होते. मात्र गेल्या वर्षी मॅक्सवेल अपयशी ठरला, तर मिलर फॉर्मात होता. यंदा दोघेही फलंदाज धावांसाठी झगडत आहेत. गोलंदाजीत त्यांची मिचेल जॉन्सनवर मदार आहे. संदीप शर्माकडे प्रतिस्पर्धी गोलंदाजांना सतावण्याची क्षमता नाही.

संघ :  रायझिंग पुणे सुपरजायंट्स : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), अजिंक्य रहाणे, केव्हिन पीटरसन, फॅफ डू प्लेसिस, स्टिव्हन स्मिथ, मिचेल मार्श, जसकिरण सिंग, आर. अश्विन, अंकित चव्हाण, अ‍ॅल्बी मॉर्केल, इरफान पठाण, इशांत शर्मा, ईश्वर पांडे, थिसारा परेरा, सौरभ तिवारी, आर. पी. सिंग, रजत भाटिया, अंकुश बैन्स, बाबा अपराजित, मुरुगन अश्विन, अशोक दिंडा, दीपक चहार, स्कॉट बोलँड, पीटर हँडस्कॉम्ब आणि अ‍ॅडम झम्पा.

किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), कायले अ‍ॅबॉट, मुरली विजय, मनन व्होरा, मिचेल जॉन्सन, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, अनुरीत सिंग, अक्षर पटेल, वृद्धिमान साहा (यष्टिरक्षक), प्रदीप साहू, संदीप शर्मा, मोहित शर्मा, मार्क्स स्टॉयनिस, स्वप्निल सिंग, अरमान जाफर, फरहान बेहरादिन, के. सी. करिअप्पा, रिशी धवन, गुरकिराट सिंग मान, निखिल नाईक, शार्दूल ठाकूर.

 वेळ : दुपारी ४ वाजल्यापासून.

थेट प्रक्षेपण : सेट मॅक्स, सोनी सिक्स.