दोन तासांहून कमी वेळेत मॅरेथॉन शर्यत पूर्ण करणारा पहिला धावपटू ईलूड किपचोगे आणि ४०० मीटर अडथळा शर्यतीमधील विश्वविजेती डॅलिया मुहम्मद यांना जगातील सर्वोत्तम अॅथलेटिक्सपटूचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
जागतिक अॅथलेटिक्स संघटनेतर्फे मोनॅको येथे झालेल्या शानदार कार्यक्रमात ३५ वर्षीय किपचोगेला सन्मानित करण्यात आले. त्याने गेल्या महिन्यात ४२.१९५ किलोमीटरचे मॅरेथॉन शर्यतीचे अंतर एक तास ५९ मिनिटे आणि ४०.२ सेकंदांत पूर्ण करून इतिहास घडवला. अमेरिकेच्या डॅलियानेही जुलै महिन्यात लोवा येथे अमेरिकन चाचणी शर्यतीत ५२.२ सेकंदांचा विश्वविक्रम नोंदवला. मग दोहा येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिने ५२.१६ सेकंदांचा नव्या विश्वविक्रम साकारला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 25, 2019 1:25 am