20 January 2020

News Flash

देशासाठी योग्य पर्याय निवडावा!

‘महासंघाशी मी स्वत: संवाद साधून त्यांना योग्य तो निर्णय घेण्याचे सागंणार आहे.

| October 19, 2019 03:27 am

किरेन रिजिजू

मेरी-निखत वादप्रकरणी क्रीडामंत्री रिजिजू यांची भूमिका

नवी दिल्ली : मेरी कोम आणि निखत झरीन यांच्यातील वादप्रकरणी भारतीय बॉक्सिंग महासंघाला योग्य खेळाडूची निवड करण्याचा सल्ला मी देऊ शकतो. मात्र याप्रकरणी मध्यस्थी करणे मला जमणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी व्यक्त केली. याव्यतिरिक्त खेळाडूंनी याबाबतीत महासंघाला कोणताही आदेश देऊ नये, असेही रिजिजू यांनी सांगितले.

आगामी टोक्यो ऑलिम्पिकपूर्वी भारतीय संघाची निवड करण्यापूर्वी सहा वेळच्या जगज्जेत्या मेरी कोमविरुद्ध आपली निवड चाचणी घ्यावी, अशी मागणी जागतिक कनिष्ठ गटातील माजी विजेती निखत झरीनने गुरुवारी पत्राद्वारे रिजिजूू यांच्याकडे केली होती.

महासंघाने मेरीला नुकत्याच झालेल्या जागतिक स्पर्धेतील कामगिरीच्या आधारावर थेट ऑलिम्पिक पात्रता मिळवून देण्याचे ठरवले असल्याने निखतने नाराजी प्रकट केली आहे. मात्र पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये चीन येथे ऑलिम्पिक पात्रता फेरी रंगणार असून यामध्ये निखतने ५१ किलो वजनी गटात मेरीविरुद्ध लढण्याची मागणी केली आहे. परंतु रिजिजू यांनी निखतला विनाकारण वाद ओढवून न घेण्याचे सुचवले आहे.

‘‘महासंघाशी मी स्वत: संवाद साधून त्यांना योग्य तो निर्णय घेण्याचे सागंणार आहे. यामध्ये निवड करताना कोणत्याही खेळाडूसाठी भावनिकरीत्या विचार न करता देशभावनेला प्राधान्य द्यावे. त्याशिवाय क्रीडामंत्री या नात्याने मी महासंघाच्या कारभारात अधिक हस्तक्षेप करू इच्छित नाही,’’ असे रिजिजू म्हणाले.

दरम्यान, निखतनेही रिजिजू यांचे आभार मानून लवकरच महासंघ आपल्या बाजूने निर्णय देईल, अशी आशा व्यक्त केली. ‘‘माझ्या पत्राचा आदर राखून त्यावर त्वरित तोडगा काढण्यासाठी पाऊल उचलल्यामुळे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांचे फार आभार. लवकरच महासंघ निष्पक्षपणे अंतिम आणि अचूक निर्णय घेईल, अशी आशा आहे,’’ असे निखतने म्हटले आहे.

First Published on October 19, 2019 3:27 am

Web Title: kiren rijiju responds to nikhat zareen letter on mary kom selection controversy zws 70
Next Stories
1 ऑलिम्पिक पात्रता  हॉकी स्पर्धा : मनप्रीत, राणीकडे भारताचे नेतृत्व
2 विजय हजारे क्रिकेट स्पर्धा : मुंबई सलग दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरीत
3 India vs South Africa 3rd Test Preview : विजयी हॅट्ट्रिकसाठी भारत सज्ज!
Just Now!
X