News Flash

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा : भारताचे ऑलिम्पिक पथक पुरस्कर्त्यांशिवाय -रिजिजू

‘आयओए’ने मंगळवारी लि निंगशी झालेला अधिकृत क्रीडा साहित्य पुरस्कर्त्यांचा करार संपुष्टात आणला

| June 10, 2021 03:03 am

किरेन रिजिजू

चीनची कंपनी लि निंगशी करार संपुष्टात

नवी दिल्ली : नागरिकांच्या भावनांचा आदर करून चिनी क्रीडा साहित्यनिर्मिती कंपनी लि निंगशी करार मोडल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) भारताच्या ऑलिम्पिक पथकासाठी नव्या पुरस्कर्त्यांचा शोध सुरू केला आहे. परंतु भारतीय क्रीडापटूंच्या क्रीडा साहित्यावर पुरस्कर्त्यांचे बोधचिन्ह नसेल, असे क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केले आहे.

‘आयओए’ने मंगळवारी लि निंगशी झालेला अधिकृत क्रीडा साहित्य पुरस्कर्त्यांचा करार संपुष्टात आणला. आता नव्या पुरस्कर्त्यांचा शोध सुरू आहे, असे ‘आयओए’चे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी सांगितले.

‘‘नव्या पुरस्कर्त्यांच्या शोधाची प्रक्रिया सुरू झाली आहे.  महिन्याअखेरीस पुरस्कर्त्यांबाबतचा निर्णय स्पष्ट होऊ शकेल. ऑलिम्पिकपात्र क्रीडापटूंचे क्रीडा साहित्य तयार आहे,’’ असे बत्रा यांनी सांगितले.

‘‘देशातील सध्याच्या वातावरणाची जाणीव असल्यामुळे आम्ही ‘आयओए’चा निर्णय मान्य केला,’’ असे लि निंग कंपनीचे भारतीय वितरक सनलाइट स्पोर्ट्स यांनी सांगितले. ‘आयओए’ने गेल्या आठवडय़ात रिजिजू यांच्या हस्ते भारतीय क्रीडापटूंना ऑलिम्पिक क्रीडा साहित्य सुपूर्द केले. चीनमधील कंपनीशी भारताने करार केल्यामुळे यावर जोरदार टीका झाली. त्यानंतर क्रीडा मंत्रालयाने ‘आयओए’ला लि निंगशी असलेला करार स्थगित करण्याचे निर्देश दिले.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 10, 2021 3:03 am

Web Title: kiren rijiju says indian athletes will go without sponsor in tokyo games zws 70
Next Stories
1 वीरेंद्र सेहवाग म्हणतो, ‘‘जर सुविधा असत्या, तर मीसुद्धा कमी वयात….”
2 भारताचा पॅरा बॅडमिंटनपटू कृष्णा नागरनं मिळवलं ऑलिम्पिकचं तिकिट!
3 युरो कप २०२० स्पर्धेचे काऊंटडाऊन सुरू, वेळापत्रक आले समोर
Just Now!
X