News Flash

कितने बॉलर थे?? ‘गब्बर’ने दिले पुनरागमनाचे संकेत

इन्स्टाग्रामवर पोस्ट केला फोटो

भारतीय संघाला सध्या दुखापतीचं ग्रहण लागलेलं आहे. अनेक महत्वाचे खेळाडू सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहेत. शिखर धवनलाही डाव्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे वन-डे मालिकेत खेळता आलेलं नव्हतं. शिखरवर नंतर बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचार करण्यात येत होते. शिखरने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टवर, घोड्यावर बसलेला फोटो टाकत आपण पुनरागमनासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे.

View this post on Instagram

Kitne bowler they? #Gabbar is back

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

कितने बॉलर थे?? गब्बर इज बॅक…अशी कॅप्शन टाकत शिखरने आपण पुनरागमनासाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे. दरम्यान न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची कामगिरी फारशी चांगली होताना दिसत नाहीये. टी-२० मालिकेत ५-० ने बाजी मारल्यानंतर भारतीय संघाला वन-डे मालिकेत ३-० ने पराभव स्विकारावा लागला. यानंतर वेलिंग्टन कसोटी सामन्यातही न्यूझीलंडने भारतावर १० गडी राखत दणदणीत विजय मिळवला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 9:11 am

Web Title: kitne bowler the shikhar dhawan announces comeback in gabbar style psd 91
Next Stories
1 ३९ वर्ष, २ हजार ९६२ वन-डे; आजच्या दिवशी सचिनने रचला होता इतिहास
2 IPL 2020 : तो परत आलाय ! चेन्नई सुपरकिंग्जने पोस्ट केला धोनीचा फोटो
3 Ind vs NZ : तो यातूनही मार्ग काढेल; मुंबईकर पृथ्वी शॉची विराटकडून पाठराखण
Just Now!
X