आयपीएलचा नवा हंगाम लवकरच सुरू होत आहे. पहिला सामना 9 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला जाईल. त्याआधी सर्व संघ कसून सराव करत आहेत. कोलकाता नाइट रायडर्स म्हणजेच केकेआर टीमचा एक सरावादरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल जोरदार फलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हिडिओमध्ये रसेलसह नॉन-स्ट्राइक एंडवर दिनेश कार्तिक आहे. रसेलने खेळलेल्या एका धोकादायक शॉटमुळे दिनेश कार्तिक जमिनीवर कोसळल्याचे पाहायला मिळत आहे. रसेलच्या बॅटमधून निघालेला चेंडू कार्तिकला गंभीर इजा करू शकला असता. मात्र कार्तिक वेगाने बाजूला सरकत आपला बचाव करतो. केकेआरने हा व्हिडिओ शेअर केला आहे.

 

गोलंदाजाना घाबरवणारा रसेल गेल्या मोसमात चांगली कामगिरी करू शकला नाही. दिनेश कार्तिकही मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. मात्र, यंदा या दोघांकडून केकेआरला खूप अपेक्षा आहेत. आयपीएल 2021मध्ये केकेआरचा पहिला सामना 11 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होईल. हैदराबादविरुद्धच्या सामन्यापूर्वी केकेआरचे सर्व खेळाडू पूर्ण सराव करण्यात गुंतले आहेत.

केकेआर संघ

ईऑन मोर्गन (कर्णधार), दिनेश कार्तिक, शुबमन गिल, नितीश राणा, टिम सेफर्ट, गुरकीरत सिंह मान, आंद्रे रसेल, सुनील नरिन, कुलदीप यादव, शिवम मावी, लॉकी फर्ग्यूसन, पॅट कमिन्स, कमलेश नागरकोटी, संदीप वारियर, प्रसिध कृष्णा, राहुल त्रिपाठी, वरुण चक्रवर्ती, शाकिब अल हसन, शेल्डन जॅक्सन, वैभव अरोरा, हरभजन सिंह, करुण नायर, बेन कटिंग, वेंकटेश अय्यर आणि पवन नेगी.