News Flash

IPL 2021 : आंद्रे रसेलच्या भन्नाट स्पेलमुळे मुंबई गारद

रसेलने घेतले 15 धावांत 5 बळी

आंद्रे रसेल

कोलकाताचा अष्टपैलू खेळाडू आंद्रे रसेलच्या झंझावाती स्पेलपुढे मुंबई इंडियन्सचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. चेन्नईवरील चिदम्बरम स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात कोलकाताने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. कोलकाताचा कर्णधार ईऑन मॉर्गनने 18व्या षटकात आंद्रे रसेलच्या हातात चेंडू सोपवला. त्यानंतर रसेलने सामन्याचे चित्रच पालटले.

सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा बाद झाल्यानंतर 18व्या षटकात आंद्रे रसेल गोलंदाजी करायला आला. त्याने कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना बाद करत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. केवळ 2 षटकात त्याने 15 धावा देत 5 बळी घेतले. या कामगिरीसह रसेलने मुंबईविरुद्ध चमकदार कामगिरी नोंदवली.

 

मुंबईविरुद्ध विक्रम

मुंबईविरुद्ध गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये रसेलने अव्वल स्थान मिळवले आहे. आयपीएल 2021च्या पहिल्या सामन्यात आरसीबीचा गोलंदाज हर्षल पटेलने मुंबईविरुद्ध 27 धावात 5 बळी घेतले होते. त्यामुळे हर्षल आता दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

कोलकातासाठी सर्वोत्तम कामगिरी

कोलकातासाठी गोलंदाजीत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या गोलंदाजांमध्ये रसेलने सुनील नरिनला मागे टाकले आहे. नरिनने 2012च्या आयपीएल हंगामात पंजाबविरुद्ध 29 धावांत 5 बळी घेतले होते. तर, वरुण चक्रवर्तीने मागील हंगामात 20 धावांत 5 बळी घेण्याची किमया केली होती. मात्र, रसेलने या दोघांना मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 13, 2021 9:57 pm

Web Title: kkr bowler andre russell took five wicket haul against mumbai indians adn 96
Next Stories
1 IPL 2021 : रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या ‘या’ गोष्टीचा वाटतो सार्थ अभिमान!
2 MI vs KKR IPL 2021 Live Update : मुंबईचा पहिला विजय, रंगतदार सामन्यात कोलकातावर मात
3 Mumbai Indians चा ‘हा’ खेळाडू आहे अभिषेक बच्चनचा फेव्हरेट!
Just Now!
X