News Flash

KKRला जबर धक्का..! पॅट कमिन्सची आयपीएलमधून माघार

संघाचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकची माहिती

पॅट कमिन्सची आयपीएलमधून माघार

अनुभवी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने संयुक्त अरब अमिरातीमध्ये सप्टेंबरपासून सुरू होणार्‍या आयपीएल २०२१मधील उर्वरित सामन्यांमधून माघार घेतली आहे. कमिन्स आयपीएलच्या १४व्या सत्रात कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) संघाचा एक भाग होता. केकेआचा यष्टीरक्षक-फलंदाज दिनेश कार्तिकने कमिन्सच्या आयपीएल न खेळण्याविषयी माहिती दिली. आयपीएल 2021 च्या दुसर्‍या टप्प्यात तो उपलब्ध होणार नाही. कमिन्सनंतर कर्णधार ईयान मॉर्गनही उर्वरित हंगामाला मुकण्याची शक्यता आहे.

कार्तिकने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “पॅट कमिन्स स्वत: म्हणाला आहे, की तो खेळायला येणार नाही. पण मॉर्गन येऊ शकतो. स्पर्धा सुरू होण्यास अजून वेळ आहे. जर मला कर्णधारपदासाठी विचारले गेले तर मी त्यासाठी तयार आहे.”

हेही वाचा – पाक कर्णधार बाबर आझमची ‘बाबर की कहाणी’ होतेय जोरदार व्हायरल!

आयपीएल २०२१च्या उर्वरित सामन्यांबाबत क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून कोणतेही अधिकृत विधान मिळालेले नाही. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने आधीच स्पष्ट केले आहे, की त्यांचे खेळाडू आयपीएलसाठी आंतरराष्ट्रीय सामने सोडणार नाहीत.

हेही वाचा – सोळावं वरीस विक्रमाचं..! इंग्लंडला मिळाला नवा ‘सचिन’

ईसीबी क्रिकेटचे संचालक एश्ले जाईल्स यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते, की इंग्लंडचे पूर्ण वेळापत्रक व्यस्त आहे. करोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या आयपीएलचे उर्वरित सामने सप्टेंबरमध्ये यूएईमध्ये होणार आहेत. मात्र, भारतात होणारा टी-२० वर्ल्डकप आयपीएळमध्ये खेळवण्याचा विचार आयसीसीने केला, तर बीसीसीआयसमोर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकते.

परदेशी खेळाडू ‘आयपीएल’च्या दुसऱ्या टप्प्यात खेळू शकले नाहीत तर फ्रेंचायझींचे खूप मोठे नुकसान होणार आहे. पॅट कमिन्सला कोलकाता नाइट रायडर्सने २०२०मध्ये १५.५ कोटी या विक्रमी रकमेला विकत घेतले होते. अमिरातीत रंगणाऱ्या उर्वरित ‘आयपीएल’मध्ये तो खेळू शकला नाही तर त्याला फक्त ७.७५ कोटी रुपयांचेच मानधन मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2021 2:31 pm

Web Title: kkr pacer pat cummins withdraws from ipl 2021 adn 96
Next Stories
1 अभिनंदन..! पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरननं केलं लग्न
2 क्वारंटाइन कालावधीनंतर ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंनी घेतली आपल्या कुटुंबीयांची भेट
3 क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! १७ सप्टेंबरपासून रंगणार आयपीएल २०२१चा दुसरा टप्पा
Just Now!
X