News Flash

पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीला देणगी देण्याचा निर्णय बदलला!

कमिन्सनंतर ब्रेट लीने भारतासाठी दिले ४२ लाख

पॅट कमिन्स

कोलकाता नाइट रायडर्सचा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने पंतप्रधान सहायता निधीला देणगी देण्याचा निर्णय बदलला आहे. त्याऐवजी कमिन्स हा निधी युनिसेफ ऑस्ट्रेलियाला देणार आहे. या निधीद्वारे भारतातील करोनाग्रस्तांची मदत केली जाईल. याआधी कमिन्सने २६ एप्रिलला ५० हजार डॉलर्सची (जवळपास ३७ लाख रुपये) देणगी पंतप्रधान सहायता निधीला देत असल्याचे सांगितले होते.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट नियामक मंडळानेही भारताला करोना संकटाच्या काळामध्ये मदत करण्यासाठी हात पुढे केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया, ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स असोसिएशन आणि युनिसेफ ऑस्ट्रेलियाने एकत्र येऊन भारतासाठी ५० हजार अमेरिकन डॉलर्सची मदत जाहीर केली होती. भारतामधील सध्याची करोना परिस्थिती चिंताजनक असून सध्या भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे सुरु असणाऱ्या घडामोडींमुळे आम्हाला खूप दु:ख होत आहे. भारतासोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध असणारा ऑस्ट्रेलिया या संकटकाळात भारतासोबत आहे, असे या संस्थांनी स्पष्ट केले आहे.

 

युनिसेफ ऑस्ट्रेलियाचा भारतासाठी पुढाकार

युनिसेफ ऑस्ट्रेलियाने भारतामधील ऑक्सिजनच्या तुटवड्यासंदर्भात काम करताना ऑक्सिजन निर्माण करणारी यंत्रणा भारतीय रुग्णालयांमध्ये उभारण्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेल्या जिल्ह्यांमधील चाचण्या वाढवण्यासाठी चाचण्यासंदर्भातील साहित्य तसेच लसीकरणासाठी आवश्यक असणारे साहित्य युनिसेफ ऑस्ट्रेलियाकडून पुरवले जाणार आहे.

पॅट कमिन्सच्या आवाहनानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रेट लीनेही भारतीयांसाठी मदतीचा हात पुढे केला. लीने ऑक्सिजन पुरवठ्यासाठी सुमारे ४२ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. कमिन्सने या कठीण काळात भारताला मदत करण्याची विनंती त्याच्या सहकाऱ्यांना केली होती. या आवाहनानंतर लीने भारताला मदत केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2021 9:12 pm

Web Title: kkr star pat cummins has opted to allocate his usd 50000 donation to unicef adn 96
Next Stories
1 IPL २०२१ बंद होणार? BCCIच्या अधिकाऱ्यानं दिलं ‘हे’ उत्तर
2 IPL २०२१ : दिल्लीच्या मैदानात काम करणाऱ्या ५ कर्मचाऱ्यांना करोनाची लागण
3 ‘‘…तुमची हिंमत कशी झाली?”, IPLच्या समालोचकाचे पंतप्रधानांना खडे बोल
Just Now!
X