02 March 2021

News Flash

क्रिकेटपटू राहुल अन् सुनील शेट्टीच्या लेकीचा ‘तो’ फोटो व्हायरल

राहुल-अथिया यांच्या अफेअरची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा

भारताचा आघाडीचा फलंदाज लोकेश राहुल व बॉलिवूड सुपरस्टार सुनील शेट्टी याची लेक अथिया यांच्या नात्याबद्दल अनेकदा सोशल मीडियावर चर्चा रंगलेल्या दिसतात. दोघांपैकी एकानेही अद्याप आपल्या नात्याबद्दल अधिकृतरीत्या कोणतीही स्पष्टता दिलेली नाही, पण त्यांचे आतापर्यंतचे फोटो पाहून त्यांचं नात ‘मैत्रीच्या पलीकडलं’ असल्याची चाहत्यांमध्ये चर्चा आहे. याचदरम्यान सध्या या दोघांना एक असा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यामुळे या चर्चांना अधिकच उधाण आलं आहे.

IND vs ENG: ना विराट, ना रोहित… ‘हा’ परदेशी फलंदाज मोडेल सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम!

राहुल आणि अथिया यांना एक हॉटेल लॉनवरील फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत हे दोघे डिनर करताना दिसत आहेत. मुळ गोष्ट म्हणजे या फोटो राहुल आणि अथिया दोघेच नसून अजूनही काही लोक आहेत. रॉबिन उथप्पा व त्याची पत्नी शीतल हे दोघेदेखील त्यांच्यासोबत डिनर करताना दिसत आहेत. रॉबिन उथप्पाची पत्नी शीतल हिने अथिया-राहुलसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमुळे पुन्हा एकदा दोघांच्याही नात्यासंदर्भातील चर्चेला उधाण आले आहे.

IND vs ENG: …तर अर्धी मिशी उडवून मैदानात खेळायला उतरेन- रविचंद्रन अश्विन

राहुल आणि अथिया एकमेकांचे अगदी जवळचे मित्र आहेत. राहुल आणि अथिया यांच्या अफेअरची जोरदार चर्चा आहे. अनेक ठिकाणी राहुल आणि अथिया अनपेक्षितपणे एकत्र दिसल्याने या चर्चांना कायमच दुजोरा मिळाला आहे. राहुल आणि अथिया अनेक वेळा एकमेकांच्या इंस्टाग्राम पोस्टवर कमेंट करताना दिसत असतात. दोघांनाही अनेक वेळा एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना कॅमेऱ्यात टिपण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2021 2:20 pm

Web Title: kl rahul athiya shetty dinner date with robin uthappa wife sheetal friends see photos vjb 91
Next Stories
1 IND vs ENG: ना विराट, ना रोहित… ‘हा’ परदेशी फलंदाज मोडेल सचिनचा सर्वाधिक धावांचा विक्रम!
2 भारतीय महिला हॉकी संघ अर्जेटिनाकडून पराभूत
3 कसोटी मालिकेत इंग्लंडचे निर्भेळ यश
Just Now!
X