News Flash

राहुल इज बॅक..! शतकी खेळीसह पुण्यात नोंदवला खास विक्रम

राहुलचे हे इंग्लंडविरुद्धचे पहिले शतक

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत फ्लॉप ठरल्यानंतर भारतीय संघाचा भरवशाचा फलंदाज केएल राहुलवर बरीच टीका झाली. राहुलला संघातून बाहेर बसवा, अशी मतेही समोर येऊ लागली होती. मात्र, पुण्यात इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जबरदस्त शतक ठोकत राहुलने टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. राहुलने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत 108 धावांची संयमी खेळी केली. शतकाव्यतिरिक्त त्याने एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

विराटला टाकले मागे

सर्वात कमी डावात 1500 धावा पूर्ण करण्याच्या बाबतीत राहुलने विराट कोहलीला मागे सोडले. 106 धावा पार करताच राहुल एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 1500 धावा पूर्ण करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्याने विराट कोहलीला मागे सोडले. राहुलने एकदिवसीय सामन्यांच्या 36 डावांमध्ये 1500 धावा पूर्ण केल्या, तर विराट कोहलीने 38 डावात ही कामगिरी केली आहे.

राहुलचे हे इंग्लंडविरुद्धचे पहिले एकदिवसीय शतक आहे. तर, या प्रकारातील हे त्याचे पाचवे शतक आहे. राहुलने आपल्या खेळीत 2 षटकार आणि 7 चौकार लगावले. सलामीवीरांच्या अपयशानंतर राहुलने विराट आणि ऋषभसोबत भागीदारी रचत संघाला एक विशाल धावसंख्या उभारण्यात मदत केली.

सर्वात कमी डावात 1500 धावा करणारे भारतीय फलंदाज

  • 36- केएल राहुल
  • 38- विराट कोहली
  • 38- शिखर धवन
  • 39- नवजोत सिंह सिद्धू
  • 43- सौरव गांगुली

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 26, 2021 5:49 pm

Web Title: kl rahul hits fifth odi century against england in pune adn 96
Next Stories
1 VIDEO: ‘सुपरमॅन’ ट्रेंट बोल्टने घेतलेला भन्नाट झेल तुम्ही पाहिला का?
2 नेमबाजी विश्वचषक : महाराष्ट्राच्या तेजस्विनी सांवतचा सुवर्णवेध
3 वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेतील पहिला कसोटी सामना अनिर्णित
Just Now!
X