ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 सामन्यांची मालिका भारताने गमावल्यानंतरही, लोकेश राहुलच्या आयसीसी क्रमवारीत सुधारणा झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेआधी दहाव्या स्थानावर असलेला राहुल, दोन सामन्यांनंतर सहाव्या स्थानावर पोहचला आहे. राहुलने विशाखापट्टणमच्या पहिल्या टी-20 सामन्यात 36 चेंडूत 50 आणि बंगळुरु टी-20 सामन्यात 26 चेंडूत 47 धावा पटकावल्या. या खेळीचा फायदा राहुलला मिळाला असून, त्याने अफगाणिस्तानच्या हजरतउल्ला झजाईला मागे टाकलं. गोलंदाजांमध्ये कुलदीप यादवचा अपवाद वगळता भारताच्या एकाही गोलंदाजाला सर्वोत्तम 10 जणांमध्ये स्थान मिळवता आलेलं नाहीये.

आयसीसीची टी-20 क्रमवारी (फलंदाज) –

1) बाबर आझम (पाकिस्तान) – 885 गुण
2) कॉलिन मुनरो (न्यूझीलंड) – 825 गुण
3) ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) – 815 गुण
4) अरॉन फिंच (ऑस्ट्रेलिया) – 782 गुण
5) एविन लुईस (विंडीज) – 751 गुण
6) लोकेश राहुल (भारत) – 726 गुण
7) हजरतउल्ला झजाई (अफगाणिस्तान) – 718 गुण
8) डार्सी शॉर्ट (ऑस्ट्रेलिया) – 715 गुण
9) फखार झमान (पाकिस्तान) – 700 गुण
10) अलेक्स हेल्स (इंग्लंड) – 697 गुण