News Flash

Ind vs NZ : रोहितच्या दुखापतीबद्दल राहुलने दिली महत्वाची माहिती, म्हणाला…

फलंदाजीदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे रोहित मैदानाबाहेर

न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात बाजी मारत भारताने ५-० च्या फरकाने मालिका जिंकत इतिहास घडवला आहे. न्यूझीलंडच्या भूमीवर टी-२० मालिकेत व्हाईटवॉश देण्याची भारतीय संघाची ही पहिलीच वेळ ठरली. अंतिम सामन्यात विराट कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे रोहित शर्माने भारतीय संघाचं नेतृत्व केलं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेत रोहितने ६० धावांची खेळीही केली.

मात्र फलंदाजीदरम्यान रोहितच्या पोटरीचे स्नायू दुखावल्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं. टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडमध्ये टी-२० आणि कसोटी मालिका खेळणार आहे..त्यामुळे रोहितचं तंदुरुस्त राहणं हे संघासाठी गरजेचं आहे. रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची भूमिका सांभाळलेल्या लोकेश राहुलने खापतीबद्दल अधिक माहिती दिली आहे.

“रोहितसोबत जे काही घडलं ते खरंच दुर्दैवी आहे. पण मला आशा आहे की येत्या काही दिवसांमध्ये तो लवकरच बरा होईल अशी मला आशा आहे.” सामना संपल्यानंतर Presentation Ceremony मध्ये राहुल बोलत होता. त्यामुळे आगामी वन-डे मालिकेआधी रोहितच्या दुखापतीबद्दल नेमकी काय माहिती समोर येतेय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

अवश्य वाचा – Ind vs NZ : जोडी तुझी माझी ! रोहित-राहुलच्या नावावर आणखी एक विक्रम जमा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2020 7:44 pm

Web Title: kl rahul provides update on rohit sharmas injury after india clean sweep new zealand in t20is psd 91
टॅग : Ind Vs Nz,Rohit Sharma
Next Stories
1 Australian Open : अंतिम सामन्यात जोकोव्हीचची सरशी, रंगतदार लढतीत थिएमवर मात
2 Ind vs NZ : जोडी तुझी माझी ! रोहित-राहुलच्या नावावर आणखी एक विक्रम जमा
3 Ind vs NZ : कर्णधार विराटच्या नावावर अनोखा विक्रम, आफ्रिकेच्या डु-प्लेसिसला टाकलं मागे
Just Now!
X