03 March 2021

News Flash

भारताचे आणखी एक पंच ICC च्या आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये

नितीन मेनन यांची जागा रिक्त झाल्यामुळे मिळालं स्थान

केरळचे माजी फिरकीपटू आणि सध्या भारतीय स्थानिक क्रिकेटमध्ये पंच म्हणून भूमिका निभावणारे के.एन. अनंतपद्मनाभन यांची आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये निवड झाली आहे. आयसीसीच्या आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये स्थान मिळवणारे अंनतपद्मनाभन हे भारताचे चौथे पंच ठरले आहेत. नितीन मेनन यांची आयसीसीच्या एलिट पॅनलमध्ये निवड झाल्यानंतर अनंतपद्मनाभन यांना आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये स्थान देण्यात आलं आहे. ESPNCricinfo ने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

अनंतपद्मनाभन यांच्याव्यतिरीक्त आंतरराष्ट्रीय पॅनलमध्ये सी. शमशुद्दीन, अनिल चौधरी आणि विरेंद्र शर्मा या तीन पंचांचा समावेश आहे. अनंतपद्मनाभन हे भारतीय स्थानिक क्रिकेटमधले अनुभवी पंच म्हणून ओळखले जातात. आयपीएलमधील अनेक सामन्यांसह, अ श्रेणीच्या सामन्यांत अनंतपद्मनाभन यांनी पंच म्हणून काम पाहिलं आहे. केरळकडून १९८८ ते २००४ या काळात अनंतपद्मनाभन यांनी १०५ प्रथमश्रेणी सामने खेळले आहेत. केरळकडून रणजी क्रिकेटमध्ये २ हजार धावा आणि २०० बळी असा विक्रम करणारे अनंतपद्मनाभन हे पहिले खेळाडू होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 9:08 pm

Web Title: kn ananthapadmanabhan promoted to iccs international panel of umpires psd 91
Next Stories
1 UAE मध्ये IPL चं आयोजन करण्यासाठी केंद्र सरकारची मान्यता – ब्रिजेश पटेल यांची माहिती
2 क्रिकेटपटूला करोनाची लागण; गेल्या वर्षी झालं ‘ब्रेन ट्युमर’चं निदान
3 चहलने साखरपुड्यानंतर लगेच पोस्ट केला ‘हा’ फोटो
Just Now!
X