२०१७ वर्षात घरचं मैदान गाजवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आता परदेशात आपल्या प्रतिस्पर्ध्यांशी दोन हात करणार आहे. २०१७ साली तुलनेने भारताला खडतरं आव्हानाचा सामना करावा लागला नाही, मात्र २०१८ साली भारतासमोर अनेक खडतंर प्रतिस्पर्ध्यांची आव्हान असणार आहेत. त्यामुळे भारतीय क्रिकेट संघ २०१८ साली कोणाकोणाविरुद्ध क्रिकेट खेळणार आहे, हे वेळापत्रक खास लोकसत्ताच्या वाचकांसाठी….

भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा – ५ जानेवारी ते २४ फेब्रुवारी

३ कसोटी, ६ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांचा समावेश

पहिली कसोटी – ५ ते ९ जानेवारी, केप टाऊन

दुसरी कसोटी – १३ ते १७ जानेवारी, सेंच्युरिअरन

तिसरी कसोटी – २४ ते २८ जानेवारी, जोहान्सबर्ग

 

पहिला वन-डे सामना – १ फेब्रुवारी, डरबन

दुसरा वन-डे सामना – ४ फेब्रुवारी, सेंच्युरिअरन

तिसरा वन-डे सामना – ७ फेब्रुवारी, केप टाऊन

चौथा वन-डे सामना – १० फेब्रुवारी, जोहान्सबर्ग

पाचवा वन-डे सामना – १३ फेब्रुवारी, पोर्ट एलिजाबेथ

सहावा वन-डे सामना – १६ फेब्रुवारी, सेंच्युरिअन

 

पहिला टी-२० सामना – १८ फेब्रुवारी, जोहान्सबर्ग

दुसरा टी-२० सामना – २१ फेब्रुवारी, सेंच्युरिअन

तिसरा टी-२० सामना – २४ फेब्रुवारी, केप टाऊन

———————————————————————-

८ ते २० मार्च, निधास चषक, भारत-बांगलादेश-श्रीलंका यांच्यात तिरंगी वन-डे मालिका

इंडियन प्रिमिअऱ लिग – ४ एप्रिल ते ३१ मे (अंदाजे तारखा)

———————————————————————–

भारताचा इंग्लंड दौरा – ३ जुलै ते ११ सप्टेंबर

३ टी-२०, ३ वन-डे आणि ५ कसोटी सामन्यांची मालिका

३ जुलै – पहिला टी-२० सामना, मँचेस्टर

६ जुलै – दुसरा टी-२० सामना, कार्डीफ

८ जुलै – तिसरा टी-२० सामना, ब्रिस्टॉल

 

१२ जुलै – पहिला वन-डे सामना, नॉटिंगहॅम

१४ जुलै – दुसरा वन-डे सामना, लंडन, लॉर्ड्स

१७ जुलै – तिसरा वन-डे सामना, लीड्स

 

१ ते ५ ऑगस्ट – पहिला कसोटी सामना – एजबस्टन

९ ते १३ ऑगस्ट – दुसरा कसोटी सामना – लंडन, लॉर्ड्स

१८ ते २२ ऑगस्ट – तिसरा कसोटी सामना नॉटिंगहॅम

३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर – चौथा कसोटी सामना – साऊद्म्टन

७ ते ११ सप्टेंबर – पाचवा कसोटी सामना – लंडन, ओव्हल

—————————————————————————

आशिया चषक – १५ ते ३० सप्टेंबर
ही स्पर्धा भारतात होणार असून यात अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि पाकिस्तान हे संघ सहभागी होणं अपेक्षित आहे. पाकिस्तान संघाच्या सहभागावर अजुन प्रश्नचिन्ह आहे.

वेस्ट इंडिजचा भारत दौरा – ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१८
आयसीसीने आखून दिलेल्या वेळापत्रकानुसार, वेस्ट इंडिजचा संघ भारतात ३ कसोटी, ५ वन-डे आणि १ टी-२० सामना खेळणार आहे. मात्र या दौऱ्याचं वेळापत्रक अजुन जाहीर करण्यात आलेलं नाहीये.

भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा – ४ कसोटी सामन्यांची मालिका
भारताच्या या दौऱ्याचं वेळापत्रकही अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाहीये.