२०१७ हे वर्ष भारतीय क्रिकेट संघासाठी अत्यंत फलदायी मानलं जातंय. मात्र याच वर्षात चॅम्पियन्स करंडकात भारतीय संघाला पाकिस्तानकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला, आणि यानंतर भारतीय संघाला आपल्या पाठीराख्यांचा रोष सहन करावा लागला. मात्र यादरम्यान भारतीय हॉकी संघ आणि बॅडमिंटनपटूंनी चांगली कामगिरी करत भारतीयांना आपली दखल घ्यायला भाग पाडली. आगामी वर्षात भारतीय हॉकी संघ आणि बॅडमिंटनपटूंसमोर अनेक महत्वाच्या स्पर्धा आहेत. या स्पर्धेत भारतीय संघ कशी कामगिरी करतोय याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

२०१८ सालचं भारतीय हॉकी संघाचं वेळापत्रक –

१) ४ ते १५ एप्रिल – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा – ऑस्ट्रेलिया

२) १३ ते २० मे – आशियाई चॅम्पिअन्स ट्रॉफी – दक्षिण कोरिया

३) २१ जुलै ते ५ ऑगस्ट – महिला हॉकी विश्वचषक – इंग्लंड

४) २३ जुन ते १ जुलै – चॅम्पिअन्स ट्रॉफी – नेदरलँड

५) १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर – आशियाई खेळ – जकार्ता

६) २८ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर – पुरुष हॉकी विश्वचषक – भारत

——————————————————————

२०१८ सालचं भारतीय बॅडमिंटनपटूंचं वेळापत्रक –

१) ६ ते ११ फेब्रुवारी – सांघिक आशियाई बॅडमिंटन चॅम्पिअनशिप

२) १४ ते १८ मार्च – ऑल इंग्लंड चॅम्पिअनशिप

३) ४ ते १५ एप्रिल – राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा

४) २४ ते २९ एप्रिल – आशियाई बॅडमिंटन चॅम्पिअनशिप, चीन

५) २० ते २७ मे – थॉमस आणि उबर चषक, बँकॉक (थायलंड)

६) ३० जुलै ते ५ ऑगस्ट – जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धा

७) १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर – आशियाई खेळ, जकार्ता